येत्या 9 जुलै रोजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे (Mumbai-Pune Express Way) दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तर दोन्ही मार्गाअंतर्गत दिशादर्शक फलक बसवण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद असणार आहे.
दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबई-पुणे एक्सप्रेस वे येथे दिशादर्शक फलक बसण्यात येणार आहे. त्यामुळे अवजड वाहनांसाठी पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तर अवजड आणि माल वाहतूक एक्सप्रेस वे वरील खालापूर टोलनाका आणि कुसगाव टोलनाक्यापूर्वी थांबवण्यात येणार आहे.(मुंबई-अहमदाबाद हायवे वर टॅम्पो-कारचा अपघात; एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू, एकजण जखमी)
मात्र हलकी चारचाकी वाहने आणि अन्य वाहने एक्सप्रेस वे वरील कुसगाव टोलनाका मार्गावरुन जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवण्यात येणार आहेत.