मुंबई-अहमदाबाद हायवे वर टॅम्पो-कारचा अपघात; एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू, एकजण जखमी
Image used for representational purpose | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रातील पालघर येथील मुंबई-अहमदाबाद हायवे वर एका टॅम्पो आणि कारच्या अपघातात एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला आहे. जखमी झालेल्या महिलेवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. थॉमस उलेदार, बेली थॉमस उलेदार, इदरील थॉमस उलेदार अशी मृत झालेल्या तिघांची नावे असून हे कुटुंब नायगाव येथे राहत होते.

वाळीव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद हायवेवर मागून आलेल्या एका वाहनाने उलेदार कुटुंबाच्या नॅनो कारला जबरदस्त टक्कर दिली. त्यामुळे नॅनो कार हायवेच्या दुसऱ्या बाजूला जावून पडली आणि भरधाव वेगाने येत असलेल्या टॅम्पोची धडक तिला बसली. (कर्नाटक येथे रिक्षा आणि बसचा भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू तर 20 पेक्षा अधिक जखमी)

ANI ट्विट:

याप्रकरणी पोलिसांनी टॅम्पो ताब्यात घेतला आहे. तसंच ड्रायव्हर विरोधातही गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र कारला मागून धक्का मारणाऱ्या वाहनचालक फरार आहे. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत असून लवकरच फरार वाहनचालकाचा शोध घेण्यात येईल.