मुकेश अंबानी यांचे निवास्थान Antilia बाहेर सुरक्षा वाढवली, टॅक्सी चालकाने पोलिसांना दिली संशयीतांबाबत माहिती
Mukesh Ambani's residence Antilia | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे निवास्थान अँटीलिया (Antilia) बाहेर मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. एका टॅक्सी चालकाने (Taxi Driver) दोन संशयास्पद व्यक्तींबाबत दिलेल्या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. एका टॅक्सी चालकाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करुन माहिती दिली की, दोन संशयास्पत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थान अँटीलीयाचा पत्ता विचारला आहे. या दोन संशयास्पद व्यक्तींच्या हातात एक बॅक होती.

टॅक्सी चालकाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी लगेच सतर्कता दाखवत अँटीलीया बाहेरची सुरक्षा वाढवली. तसेच आजुबाजूच्या परिसरातही सुरक्षा वाढवली. टॅक्सी चालकाने पोलिसांना माहिती देताना सांगितले की, दोन दाढीधारी व्यक्तींनी मुकेश अंबानी यांच्या निवास्थानाचा पत्ता विचारला. (हेही वाचा, मुंबई: मुकेश अंबानी यांच्या Antilia जवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार, बॉम्ब शोधक-विनाशक पथाकडून अधिक तपास सुरु (Video))

एएनअय ट्विट

पोलिसांनी कथीत माहितीवरुन तपास सुरु केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही मागवले आहे. तसेच डीसीपी दर्जाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.