Woman Trekker Rescued By Mumbai Police: कर्नाळा किल्ल्यावर  जखमी महिला ट्रेकरच्या मदतीला धावून आले मुंबई पोलिस; Watch Video
Woman Trekker Rescued By Mumbai Police (PC - Instagram)

Woman Trekker Rescued By Mumbai Police: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एका महिला ट्रेकरला मुंबई पोलिसांनी क्विक रिस्पॉन्स (Quick Response) दिल्याचं पाहायला मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा किल्ल्यावर ही महिला जखमी झाली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत मुंबई पोलिसांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, "क्विक रिस्पॉन्स नो मॅटर द सिच्युएशन!"

व्हिडिओमध्ये, मुंबई पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीम एका जखमी महिलेला कर्नाळा किल्ल्याच्या जंगलात घेऊन जाताना दिसत आहे. या घटनेबद्दल आणि प्रतिसाद पथकाने महिलेला दिलेल्या मदतीचे स्वरूप याविषयी अधिक माहिती देताना, मुंबई पोलिसांनी लिहिले, 'आमच्या क्विक रिस्पॉन्स टीमचे नवीन भरती, कर्नाळा किल्ल्यावर प्रशिक्षण घेत असताना एका ट्रेकरच्या पायाला फ्रॅक्चर झाले. कोणतेही बचाव पर्याय उपलब्ध नसताना, भरती झालेल्यांनी त्यांच्या ट्रॅकसूटसह तात्पुरते स्ट्रेचर बनवले आणि जखमी महिलेला 2 तासांत बेस कॅम्पवर आणले. तिला वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.' (हेही वाचा -Nikhil Wagle On Mumbai Police: तक्रारीची प्रत न मिळाल्याने निखिल वागळेंनी मुंबई पोलिसांसाठी वापरला 'नालायक' शब्द; पोलिसांनी पोस्ट करत म्हटलं...)

पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

घटनास्थळी उपस्थित असलेल्या क्विक रिस्पॉन्स टीमच्या सदस्यांनी जखमी ट्रेकरला सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचण्यास मदत केली. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.

निखिल वागळे यांची मुंबई पोलिसांवर टीका -

पत्रकार निखिल वागळे यांनी 26 जानेवारीला तक्रार दाखल केल्यानंतर 48 तासांनंतरही तक्रारीची प्रत मिळाली नसल्याचा आरोप करत मुंबई पोलिसांवर टीका केली होती. तसेच त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर मुंबई पोलिसांना "नालायक" असं म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर मुंबई पोलिसांच्या अधिकृत खात्याने वागळे यांचे आरोप फेटाळून लावले आणि त्यांना योग्य भाषा वापरण्याचा सल्ला दिला.