मुंबई मध्ये आज क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या घरासमोर आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आंदोलन केले आहे. ऑनलाईन गेम्सच्या जाहिराती (Online Games Ads) मध्ये सचिन तेंडुलकर दिसत असल्याने बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. भारतरत्न पुरस्काराने नावजलेल्या व्यक्तीने अशाप्रकारे ऑनलाईन गेम्सची जाहिरात करून तरूणपिढीसमोर चूकीचे आदर्श ठेवले जात आहेत. त्यांनी जाहिरात सोडावी अन्यथा भारतरत्न पुरस्कार पुन्हा द्यावा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. सध्या बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर सध्या मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सचिन तेंडुलकर पैशांसाठी जाहिरात करत असतील तर त्यांच्या साठी येत्या गणेशोत्सवामध्ये आपण खास दानपेटी ठेवणार आहोत. त्यामध्ये गोळा झालेले पैसे सचिन तेंडुलकर यांना दिले जातील असं बच्चू कडूंनी आज म्हटलं आहे. जर सचिन तेंडुलकर यांच्याकडे भारतरत्न नसता तर आम्ही आंदोलन केलं नसतं असंही ते म्हणाले आहेत.
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना वारंवार paytm first जुगाराची जाहीरात बंद करण्याची विनंती केली. परंतु अद्याप ही जाहीरात बंद नाही झाली आहे. आमचा विरोध तेंडुलकरना नाही परंतु भारतरत्न व्यक्तीस ही बाब अशोभनीय आहे. एकतर त्यांनी जाहीरात बंद करावी नाहीतर भारतरत्न परत करावा. (१/२) pic.twitter.com/Qi4uernXwR
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) August 31, 2023
आमदार बच्चू कडू यांनी यापूर्वी एक पत्र लिहून सचिन तेंडुलकर यांच्या विरूद्ध आंदोलनाचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी पत्र लिहलं होतं. परंतू कोणतीच कारवाई न झाल्याने अखेर आज त्यांनी मुंबईतील सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर आंदोलनाला सुरूवात केली आहे. Legal Notice To Sachin Tendulkar: आमदार Bachchu Kadu पाठवणार सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण .
बच्चू कडू हे अचलपूरचे अपक्ष आमदार आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांनी सचिन तेंडुलकर यांच्या ऑनलाईन गेम्सच्या जाहिरातीमध्ये झळकण्याला प्रखर विरोध केला आहे.