मुंबई शहरातील धारावी (Dharavi Area) परिसरात एका दाम्पत्यावर एकाकडून चाकूहल्ला (Mumbai Crime News) करण्यात आला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला. मंगळवारी (17 जानेवारी) रात्री आठच्या सुमारास पती-पत्नी बाहेर निघाले होते. दरम्यान, एक व्यक्ती तिथे आला आणि त्याने पतीवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. पतीवर होत हल्लेला हल्ला पाहून पत्नी बचावासाठी आली. परंतू, हल्लोखोर जुमानला नाही. त्याने वार सुरुच ठेवले. या घटनेत पत्नीही मोठ्या प्रमाणावर जखमी झाली. सदर घटनेबाबत माहिती मिळताच धारावी पोलीस (Dharavi Police Station) घटनास्थळी पोहोचले. मात्र, आरोपी तोपर्यंत फरार झाला होता. जखमी पतीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.
मृत व्यक्तीचे नाव जाहिद असल्याची प्रथामिक माहिती आहे. तो एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी दिली आहे. दरम्यान, हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. पूर्ववैमनस्य अथवा काही किरकोळ वादातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांना संशय आहे. (हेही वाचा, Kota Suicide Case: कोचिंग इन्स्टिट्यूटच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, तपास सुरू)
ट्विट
Two unidentified people stabbed a man in Mumbai's Dharavi area. The injured person was taken to Sion Hospital where doctors declared him brought dead. Dharavi police have registered a case under section 302. Search for accused underway: Mumbai Police
— ANI (@ANI) January 17, 2023
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना धारावी येथील 90 फूट रोडवर घडली. हे ठिकाणी धारावी पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर आहे. वाहतूक आणि नागरिकांनी गजबजलेला परिसर अशी या ठिकाणाची ओळख आहे. या घटनेत पती मृत झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पत्नीवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घडल्या प्रकारामुळे परिसरात बराज वेळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्लेखोर इतका बेभान झाला होता की, जमलेल्या गर्दीतून त्याला कोणी पकडण्याचेही धाडस दाखवले नाही.