मुंबईत ओला कारची लवकरच सेल्फ ड्राइव्ह सर्विस सुरु होणार

ओला (OLA) कंपनी आता लवकरच सेल्फ ड्राइव्ह सर्विस (Self Drive Service) मुंबईत सुरु करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे याचा फायदा शेअरिंग टॅक्सी किंवा ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारांसाठी होणार आहे.

Close
Search

मुंबईत ओला कारची लवकरच सेल्फ ड्राइव्ह सर्विस सुरु होणार

ओला (OLA) कंपनी आता लवकरच सेल्फ ड्राइव्ह सर्विस (Self Drive Service) मुंबईत सुरु करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे याचा फायदा शेअरिंग टॅक्सी किंवा ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारांसाठी होणार आहे.

महाराष्ट्र Chanda Mandavkar|
मुंबईत ओला कारची लवकरच सेल्फ ड्राइव्ह सर्विस सुरु होणार
Representational Image (Photo: Ola branch office)

ओला (OLA) कंपनी आता लवकरच सेल्फ ड्राइव्ह सर्विस (Self Drive Service) मुंबईत सुरु करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे याचा फायदा शेअरिंग टॅक्सी किंवा ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारांसाठी होणार आहे. सध्या सेल्फ ड्राइव्ह सर्विस बंगळूरु येथे गुरुवार पासून सुरु करण्यात आली आहे. मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत ही ओलाची कॅब सर्विस सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या देशात आर्थिक मंदीचा फटका ऑटो इंडस्ट्रिला बसला असून गेल्या काही महिन्यात वाहन खरेदीचा टक्का घसरला आहे. तसेच वाहन चालकांना स्वत;ची गाडी चालवण्यास काही वेळेस कंटाळा येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा वेळी वाहन चालक ओला, उबर सारख्या कॅब सर्विसने प्रवास करणे पसंद करतात. परंतु आता ओलाची सेल्फ ड्राइव्ह सर्विसमुळे वाहन चालकांना सार्वजनिक वाहनांचा वापराचा उपयोग करता येणार आहे.

ओलाची 24/7 हेल्पलाईन सुविधा ग्राहकांसाठी सुरु राहणार आहे. त्यामध्ये ग्राहकांना आपत्कालीन बटण आणि रिअल टाइम ट्रॅकिंग हे ऑप्शन देण्यात येणार आहे. त्याचसोबत रस्त्याच्याकडेला ओलाचा सहाय्यक ग्राहकाचा प्रवास सुकर, आरामदायी किंवा सुरक्षित झाला की नाही याबाबत सुद्धा माहिती घेणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.(Uber India लवकरच कॉल आणि एसएमएस च्या माध्यमातून कॅब बुकिंगची सोय देणार)

तसेच काही दिवसांपूर्वी उबर कंपनीने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्राहक कोणत्याही वेळी प्रवासादरम्यान गाडी खराब होणे, चालकासोबत वाद, गैरवर्तवणुक याबाबत फोन करुन त्याची तक्रार व्हॉट्सअॅपच्या (WhatsApp) माध्यमातून करता येणार आहे. यापूर्वी कंपनीने हेल्पाइन मध्ये फक्त टेक्स मेसेज करण्याचे ऑप्शन देण्यात आले होते. मात्र आता तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअॅप कॉलची सुविधा प्रवाशाला उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change