प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी  मुंबई महानगर पालिकेने तयारी सुरू केली आहे. धोकादायक पूलांची तपासणी करून निलकांत नल्ला ब्रीज (Neelkanth Nalla Bridge) हा धोकादायक जाहीर केला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते विद्याविहार स्टेशन यांना जोडणारा हा ब्रीज 16 नोव्हेंबर 2019 पर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी  (Mumbai Police) आज ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

मुंबई पोलिस ट्विट

मुंबई पोलिसांच्या ट्विटवर बदललेल्या वाहतुकीच्या मार्गाची माहिती दिली आहे. 17 जून पासून 16 नोव्हेंबर दरम्यान डागडुजीच्या कामांसाठी हा बंद ठेवण्यात आला आहे.

मागील वर्षी अंधेरी येथील गोखले पूलाचा भाग कोसळल्यानंतर त्याची डागडुजी करून वर्षभरानंतरतो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.