मुंबई: मुंबादेवी मंदिर ट्रस्ट कडून COVID 19 संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 21 लाखाची मदत
Chief Minister Uddhav Thackeray | (File Photo)

मुंबई शहराचं श्रद्धास्थान असलेल्या मुंबादेवी मंदिर ट्रस्ट कडून कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी 21 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाचं संकट हे जसं जागतिक आरोग्य संकट आहे तसंच आता हळूहळू त्याचा आर्थिक फटकादेखील बसायला सुरूवात झाली आहे. अशावेळेस सरकार आणि गरजूंच्या मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. अनेक देवस्थानांकडून त्यांची दानपेटी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामध्ये आता मुंबादेवी मंदिर ट्रस्टचादेखील समावेश आहे. मुंबादेवी प्रमाणेच यापूर्वी शिर्डी साई संस्थान, मुंबई श्रीसिद्धिविनायक मंदिर यांच्याकडून आर्थिक आणि सामाजिक मदतीचा हात पुढे आला आहे. Coronavirus Outbreak: शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट कडून महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधी ला 51 कोटीची मदत जाहीर.

भारतामध्ये लॉकडाऊनचे आदेश जारी करण्यापूर्वीच अनेक देवस्थानांनी अनिश्चित काळासाठी धार्मिक प्रार्थनास्थळं बंद केली आहेत. दरम्यान यामुळे अनावश्यक गर्दी टाळणं हा हेतू होता. त्यानुसार धार्मिकस्थळं सध्या भाविकांसाठी बंद असून केवळ ठराविक पुजारी देवाच्या पूजा अर्चा करतात.

PM Care Fund बनावट वेबसाइट्स ; मुंबई- पुण्यातसह अनेक शहरात ७८ गुन्हे दाखल - Watch Video

महाराष्ट्रासह देशात सध्या वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण करणारा आहे. मात्र सरकारकडून संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर असल्याचं सांगत घरीच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 891 पर्यंत पोहचला आहे.