महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सरकारने देशभर संचारबंदी लागू करत आता लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. पुढील काही दिवस सारेच व्यवहार ठप्प राहणार असल्याने आता तळहातावर पोट असणार्या अनेकांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र देशातील कोणत्याच घटकातील नागरिकाची गैरसोय होऊ नये म्हणून केंद्र सरकारने खास आर्थिक मदत जाहीर केली आहे. आता सरकरच्या बरोबरीने कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी धार्मिक स्थळ, मंदिरं, संस्थान पुढे आली आहेत. आज शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्र्स्ट (Shri Saibaba Sansthan Trust) ने देखील महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 51 कोटीची मदत करत असल्याचं जाहीर केलं आहे. ही मदत कोव्हिड 19 या जागतिक आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान राज्यात कोरोना व्हायरसने पाऊल ठेवल्याची जाणीव झाल्यानंतर तात्काळ देवदर्शनासाठी मंदिर बंद करण्याला शिर्डी साई संस्थानने सुरूवात केली होती. दरम्यान आता देशभरातील धार्मिक प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. अनावश्यक गर्दी टाळण्याच्या दृष्टीकोनातून सरकारचा पुढील आदेश मिळेपर्यंत आता सारीच धार्मिक प्रार्थना स्थळं बंद राहणार आहेत. मात्र या कठीण काळात नागरिकांच्या सोयीसाठी मात्र दानपेट्या उघडून त्याच्यातून आर्थिक मदत सुरू झाली आहे.
मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे श्री सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी येथील गणेश मंदिरातील स्वयंसेवकांनी शहरात असलेल्या गरजूंना, रस्त्यावर अडकलेल्यांना अन्न वाटप केले आहे. देशावर कोरोनाचं गंभीर संकट येऊन धडकलं असलं तरीही देशातील एकही व्यक्ती उपाशी पोटी झोपणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असं सरकारने म्हटलं आहे. Coronavirus मुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दान करणार महिन्याभराचा पगार.
ANI Tweet
Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi has donated Rs 51 Crore to Maharashtra Chief Minister's Relief Fund to fight the #COVID19 pandemic. pic.twitter.com/wTepDtH9Hw
— ANI (@ANI) March 27, 2020
कोरोनाचा विळखा सध्या जगभर पसरला आहे. युरोप, अमेरिकेमध्ये कोव्हिड 19 हा आजार मृत्यूचं तांडव घालत आहे. मात्र भारतामध्ये कोरोना व्हायरस गंभीर स्वरूप घेऊ नये म्हणून त्याला आळा घालण्यासाठी सारे व्यवहार ठप्प करत लोकांना पुढील काही दिवस घरीच बसण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काल भारतामध्ये एका दिवशी 88 नवे रूग्ण आढळले आहेत. हा एका दिवसात नवे रूग्ण आढळ्याचा सर्वाधिक आकडा आहे.