
मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयातून (Lilavati Hospital) डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच डॉक्टरांनी त्यांना घरीच क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे. आमित ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी ताप आणि खोकला येत होता. ज्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. दरम्यान, त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, कोरोनाची लक्षणे कमी झाल्याने त्यांना 4 दिवसातच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच त्यांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अमित ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी ताप आला होता. ताप आल्यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तसेच डॅाक्टारांनी घरीच त्यांच्यावर औषध उपचार सुरु केले. परंतु, कोरोनाची लक्षण असल्याने अमित ठाकरे यांनी खबरदारी म्हणून स्वतःच विलगीकरण केले होते. दोन दिवसानंतर ताप तर गेला. मात्र, खोकला जात नसल्याने डॅाक्टरांनी त्यांची कोरोना चाचणी करुन घेतली, ज्याचा अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. त्यानंतर अमित यांनी डॅाक्टरांशी बोलून लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. हे देखील वाचा- Anil Deshmukh CBI Inquiry: अनिल देशमुख यांच्या चौकशीच्या निमित्ताने सीबीआय राजकीय उद्दिष्टे साध्य करते आहे- जयंत पाटील
यापूर्वी, राज ठाकरे यांच्यावर लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या पायाच्या मसल टिशूमध्ये रक्त जमा झाले होते. त्यामुळे होणारा दबाव कमी करण्यासाठी हॅमेटोमा ड्रेनेजची छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यावेळी डॉक्टरांनी राज ठाकरे यांना सहा आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती शर्मिला ठाकरे यांनी दिली होती.