मुंबईकरांसाठी तब्बल 4 वर्षांनंतर यंदा म्हाडाच्या घरांसाठी सोडत (MHADA House Lottery) जाहीर झाली आहे. 4083 घरं या सोडतीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत. दरम्यान त्यासाठी आता अर्ज नोंदणी आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आज 22 मे पासून सुरूवात होणार आहे. दुपारी 3 वाजल्यापासून ही प्रक्रिया ऑनलाईनच्या माध्यमातून सुरू होणार आहे. mhada.gov.in या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करण्याची आणि सदनिकांची सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. दरम्यान या घरांसाठीची सोडत 18 जुलै दिवशी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये संगणकीय माध्यमातून जाहीर होणार आहे.
म्हाडा कडून या सोडतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) मध्ये 1947 घरांचा समावेश आहे. यामध्ये एकूण 4083 घरांपैकी अत्यल्प गटामध्ये 2790, अल्प गटामध्ये 1034, मध्यम गटामध्ये 139 आणि उच्च गटामध्ये 120 घरांचा समावेश आहे. Mumbai MHADA Lottery 2023: मुंबईत म्हाडा चार हजार घरांसाठी काढणार सोडत, गोरेगाव येथे 2, 638 घरांचा प्रकल्प, जाणून घ्या, सविस्तर माहिती .
मुंबई म्हाडा घरांसाठीचं अर्ज - सोडत प्रक्रिया वेळापत्रक
अर्ज विक्री सुरू - 22 मे 2023 दुपारी 3 वाजल्यापासून
अर्ज सादर करण्याची मुदत - 26 जून संध्याकाळी 6 पर्यंत
अनामत रक्कम ऑनलाईन भरणं - 26 जून रात्री 11.59 पर्यंत
प्राप्त अर्जांची प्रारूप यादी - 4 जुलै दुपारी 3 पर्यंत
ऑनलाईन दावे - हरकती - 7 जुलै दुपारी 3 पर्यंत
स्वीकृत अर्जांची अंतिम यादी 12 जुलै दुपारी 3
सोडत - 18 जुलै 2023 सकाळी 11 वाजता
मुंबई म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सशुल्क आहे. 590 रूपये प्रति फॉर्म शुल्क आहे. ही रक्कम अर्जदारांना पुन्हा दिली जाणार नाही. म्हाडा ने या घरांच्या लॉटरीसाठी प्रक्रिया पूर्णपणे संगणकीय आणि पारदर्शी केली आहे. त्यामुळे म्हाडाच्या नावे कोणीही फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्यास अथवा पैशांची मागणी करत असल्यास त्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.