Mumbai Local Train | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

1 डिसेंबरला म्हणजेच उद्या मुंबईच्या तीनही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. यात मुंबईच्या मध्य (Central Railway), हार्बर (Harbour Railway) आणि पश्चिम मार्गावर (Western Railway) हा मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. यात कल्याण ते ठाणे दरम्यान सकाळी 11.20 ते संध्याकाळी 3.50 पर्यंत, वडाळा ते वाशी दरम्यान सकाळी 11.10 ते संध्याकाळी 3.40 पर्यंत आणि पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते वैतरणा रोड अप-डाऊन मार्गावर सकाळी 11.50 ते 4.30 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना मेगाब्लॉकच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. प्रत्येक रविवारी मेगाब्लॉक असणे हे मुंबईकरांसाठी काही नवीन राहिलेले नाही. येत्या 1 डिसेंबरला म्हणजे उद्याच मुंबईच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

असे असेल रेल्वेचे वेळापत्रक:

मध्य रेल्वे:

कल्याण ते ठाणे स्टेशन दरम्यान सकाळी 10.54 ते 3.52 वाजेपर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला असून या वेळेत सर्व गाड्या या धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. तर ठाणे ते सीएसएमटी दरम्यान सर्व गाड्या मुलूंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा स्टेशनदरम्यान थांबविण्यात येणार आहे. या मार्गावर रेल्वे या 20 मिनिटे उशिराने धावतील.

हेदेखील वाचा- रेल्वेच्या प्रवासी भाड्यात होण्याची शक्यता; जाणून घ्या या दरवाढीची कारणे

पश्चिम रेल्वे:

वसई ते वैतरणा रोड अप मार्गावर सकाळी 11.50 ते दुपारी 2.50 पर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. तर याच डाऊन मार्गावर दुपारी 1.30 ते 4.30 दरम्यान मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे.

हार्बर रेल्वे:

वडाळा रोड ते वाशी अप-डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे.

या मेगाब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पनवेव-वाशी-पनवेल दरम्यान विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवाशांनी सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्या आली आहे.