Narayan Rane यांच्याकडून 28 वर्षीय तरूणीची  मृत्यूनंतरही बदनामी सुरूच; महिला आयोगा ने कारवाई करण्याचं  महापौर किशोरी पेडणेकर यांचं आवाहन
Kishori Pednekar | (Photo Credits: ANI)

नारायण राणे (Narayan Rane) यांच्याकडून आज शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर झालेल्या आरोपांच्या फैरींवर शिवसेना भवनातून पुन्हा चोख प्रत्युत्तरं देण्यात आली आहेत. दरम्यान संजय राऊत, विनायक राऊत आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद संबोधित केली आहे. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी मुंबई मध्ये सुशांतसिंह राजपूतच्या माजी मॅनेजरचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याच्या आरोपाला फेटाळले आहे. राणे या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगत तिचं चारित्र्यहनन करत आहेत असे म्हणाल्या आहे. याप्रकरणी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय महिलांनी आवाज उठवला पाहिजे. तसेच महिला आयोगाला विनंती आहे की, या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करा. असेही त्या म्हणाल्या आहेत.

28 वर्षीय मृत मुलीची केस सीबीआयकडे देण्यात आली होती. ज्या पद्धतीनं त्या मुलीचा मृत्यू झाला आहे ते वाईटच आहे. त्यांची मृत्यूनंतर बदनामी त्याहून वाईट आहे. तिचा पोस्टमार्टम रिपोर्ट खोटं ठरवण्याचं काम नारायण राणेंनी केलं आहे. पोस्टमार्टममध्ये असलेल्या गोष्टी खऱ्या आहेत असं तिच्या वडिलांनी देखील हात जोडून सर्वांना विनंती करत सांगितलं होतं पण तरीही बदनामी सुरू असल्याने तिच्या चारित्र्याचं हनन होत आहे. असे महापौर म्हणाल्या आहेत. ही केस सीबीआयकडे केस दिली होती, त्यात काय झालं होतं हे आम्हालाही सांगावं. असे आव्हान देखील त्यांनी दिलं आहे. नक्की वाचा: Narayan Rane on BMC Notice: जुहू येथील बंगल्यासंदर्भात महापालिकेच्या नोटीसीनंतर नारायण राणे यांचे स्पष्टीकरण.

28 वर्षीय या मुलीचा मृत्यू 8 जून 2020 ला मुंबईत मालाड (पश्चिम) भागात एका रहिवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडल्यानंतर झाला होता. त्यानंतर काही दिवसांत, 14 जूनला 34 वर्षीय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या वांद्रे भागातील राहत्या घरी आढळला. सुशांत प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलीस करत होते. मात्र, ऑगस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.

दरम्यान नारायण राणे यांनी पत्रकार परीषदेमध्ये बोलताना  पीडीतेवर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते, असा सवाल उपस्थित केला आहे त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फूटलं आहे.