Narayan Rane on BMC Notice: जुहू येथील बंगल्यासंदर्भात महापालिकेच्या नोटीसीनंतर नारायण राणे यांचे स्पष्टीकरण
नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Narayan Rane on BMC Notice: भाजप खासदार नारायण राणे यांना त्यांच्या मुंबईतील जुहू येथे असललेल्या बंगल्यासंदर्भात महापालिकेने नोटीस धाडली. त्यात असे म्हटले होते की, बंगल्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची तक्रार आली आहे. यामुळे महापालिकेचे अधिकारी बंगल्याची पाहणी करणार असल्याची ही चर्चा होती. अशातच आता नारायण राणे यांनी या नोटीसीला प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे यांनी असे म्हटले की, जेव्हा मला महापालिकेची नोटीस आली तेव्हा मी दिल्लीत होतो. परंतु माझा बंगला हा प्रसिद्ध आर्किटेक्ट यांनी 17 सप्टेंबर 2009 मध्ये 1991 च्या डेव्हलपमेंट कंन्ट्रोल रेग्युलेशन अंतर्गत बांधले आहे. त्याचसोबत एक इंच इमारत ही कोणत्याही अनधिकृत कामासाठी वापरली जात असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले आहे.

राणे यांनी पुढे असे म्हटले की, माझ्या परिवारातील आठजण येथे राहतात. तसेच येथे कोणतीही व्यावसायिक गोष्ट केली जात नाही. परंतु तरीही शिवसेनेने महापालिकेकडे तक्रार केली. त्यांच्या हातात महापालिका असल्याची टीका सुद्धा नारायण राणे यांनी केली आहे.(BMC Issues Notice to Narayan Rane: नारायण राणे यांना मुंबई महापालिकेची नोटीस)

Tweet:

तर काही दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन, भाजपच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भाजप आणि सेनेमध्ये शाब्दिक चकमक सुरु आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीदेखील पत्रकार परिषद घेऊन सेनेवर टीकास्त्र सोडले. त्या टीकेला सेनेचे खासदार विनायक राऊत प्रत्युत्तर दिले. नारायण राणेंच्या मागे जेव्हा ईडी लावली तेव्हा ते भाजपासाठी सरेंडर झाले, असे म्हणत राऊत यांनी 3 व्हिडीओ दाखवत राणेंवर टीकास्त्र सोडले.