भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांना मुंबई महापालिकेने (BMC) नोटीस पाठवल्यचे वृत्त आहे. मुंबई परीसरातील जुहू (Juhu ) येथे नारायण राणे यांचा बगंला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार आल्यानंतर पालिकेने राणे यांना नोटीस पाठवल्याचे समजते. या नोटीशीला नारायण राणे का प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांना धार आली आहे. राजकारण जोरदार तापले आहे. सत्ताधारी शिवसेना आणि विरोधातील भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. दरम्यान, राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर नुकती जोरदार टीका केली होती. त्यानंतर राणे यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.
जुहू येथील तारारोड येथे असलेल्या नारायण राणे यांचा 'अधीश' नावाचा बंगला आहे. या बंगल्यात सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार महपालिकेला प्राप्त झाली. त्यानंतर महापालिकेने राणे याना नोटीस पाठवली आहे. आलेल्या तक्रारीत खोरखरच तथ्य आहे का, राणे यांच्या बंगल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सीआरझेडचे उल्लंघन झाले आहे काय? याबातब तपासणी केली जाणार असल्याचे समजते. बीएमसीच्या के पश्चिम विभागातील बिल्डिंग प्रपोजल विभागाचे एक पथक राणे यांच्या बंगल्यात जाऊन तपासणी करेल असे नोटीशीत सांगण्यात आले आहे. (हेही वाचा, Narayan Rane On Sanjay Raut: संजय राऊत यांचे लक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीकडे, राऊत हे शिवसेनेचे नसून संपूर्ण राष्ट्रवादीचे आहेत)
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नोटीशीमध्ये म्हटले आहे की, बिल्डिंग प्रपोजल विभागाचे पथक तापसणी करण्यासाठी राणे यांच्या बंगल्यात येईल. त्या वेळी बंगल्याची आवश्यक असलेली कागदपत्रं घेऊन हजर राहा. या वेळी पालिकेचे लोक काही मोजमाप करतील. तसेच, फोटोही काढतील. या नोटीशीला नारायण राणे कसा प्रतिसाद देतात याबाबत उत्सुकता आहे.