शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल मंगळवारी शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) पत्रकार परिषद (Press Conference) घेऊन भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांना एकतर्फी उत्तर दिले आहे. संजय राऊत यांचे लक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या खुर्चीकडे, असा गंभीर आरोप नारायण राणेंनी राऊतांवर केला आहे. राऊतांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर शिवसेना वाढवणाऱ्या पक्षात संजय राऊत नाहीत. त्यामुळे त्यांचे लक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीकडे आहे. राऊत हे शिवसेनेचे नसून संपूर्ण राष्ट्रवादीचे आहेत. असा आरोप नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.
Tweet
केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे यांची पत्रकार परिषद https://t.co/w8GixuiBrd
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 16, 2022
ईडीने गप्प बसू नये, त्यांना आत घेऊन त्यांची पूजा करावी - राणे
नारायण राणे पुढे म्हणचतात, शिवसेनेला संपवण्यासाठी राऊत यांनी राष्ट्रवादीला कामाला लावले आहे. मुख्यमंत्रीपदाची मागणी करण्यासाठी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला गेले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत फक्त आदित्य ठाकरे आणि राऊत होते, असे नारायण राणे म्हणाले. ईडीने गप्प बसून त्यांची पूजा करावी, राऊतपेक्षा मुख्यमंत्र्यांनी केलेले व्यवहार मला चांगले माहीत आहेत. त्यामुळे ईडीने गप्प बसू नये आणि त्यांना आत घेऊन त्यांची पूजा करावी. त्याशिवाय तोंड गप्प नाही होणार, असा इशाराही राणेंनी दिला आहे. (हे ही वाचा CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तेलंगणाचे सीएम के चंद्रशेखर राव यांच्यात होणार भेट, कारण गुलदस्त्यात, राजकीय वर्तुळात चर्चा)
प्रवीण राऊत यांच्याशी काय संबंध?
मंत्रिमंडळात किती लोक आले आणि किती जाणार याबाबत राऊत का बोलले नाहीत? बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या खोट्या वक्तव्याचे साक्षीदार असल्याचेही राणे म्हणाले. प्रवीण राऊत यांच्याशी काय संबंध? तुम्ही पत्रकार आणि संपादक आहात आणि तुमचा प्रवीण राऊत यांच्याशी काय संबंध? तुम्ही किती व्यवहार केलेत? प्रवीण राऊतची ईडीने चौकशी केल्यानंतर आता आपण पण अडचणीत आहोत हे कळल्यावर राऊत घाबरले. त्यामुळे त्यांचा थयथयाट झाला आहे. अशी घणाघाती टीका आज नारायण राणेंनी केली आहे.