मुंबई: किरकोळ वादातून रिक्षा चालकाने शेजाऱ्यांच्या 13 वर्षीय मुलाचा खून करत शवाचे तुकडे करून जंगलात पुरले, दोषीला अटक
Representational Image (Photo Credits: PTI)

शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वाद वाढत जाऊन एका रिक्षा चालकाने आपल्या शेजाऱ्यांच्या 13 वर्षीय मुलाचा खून केल्याचा प्रकरण मुंबईतील (Mumbai) मालवणी (Malwani) भागातून समोर येत आहे. 23 वर्षीय रिक्षा चालकाने आपल्या घराबाहेर पावसाचे पाणी थांबवण्यासाठी एक छोटी भिंत बांधली होती. शेजाऱ्यांचा मुलगा खेळत असताना त्याच्याकडून ही भिंत तुटली, यातून दोन्ही कुटुंबात वाद सुरु झाला. हा किरकोळ वाद पुढे इतका वाढला की या रिक्षा चालकाने त्या मुलाला पळवून नेट त्याचा खून केला, इतकंच नव्हे तर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याने जवळच्या भागातील जंगलात पुरून सुद्धा टाकला होता. हा सर्व प्रकार शुक्रवारी उघड झाला. या जंगलात मुंंबई पोलिसांना (Mumbai Police) या शवाचे तुकडे आणि दूरवर पडलेले एक मुंडके सापडल्याने त्यांनी हा तपास केला आणि पुढे हे सर्व प्रकरण समोर आले. Murder In Pune: पिंपरी-चिंचवड येथे प्रेमप्रकरणातून एका 20 वर्षीय तरुणाचा खून; एकाच कुटुंबातील 6 जणांना अटक

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत अल्पवयीन मुलाचे नाव विद्यांनंद यादव असे असून तो इयत्ता 9 वी मध्ये शिकत होता. जेव्हा त्याचे मृत शरीर पोलिसांना सापडले तेव्हा त्याची ओळख पटवण्यासाठी त्यांनी आसपासच्या पोलीस स्थानकात विचारणा केली. आरे पोलीस स्थंकात काही दिवसांपूर्वी अशाच एका मुलाच्या हरवल्याची तक्रार आली होती. या दोन्ही मधील साम्य ओळखून शेवटी पालकांना माहिती देण्यात आली. पालकांनी सुद्धा आपल्या मुलाच्या मृतदेहाची ओळख पटवल्यावर पोलिसांनी आरोपीचा तपास सुरु केला.

दरम्यान, पोलीस तपास मृत मुलाच्या आईने करन बहाद्दूर या शेजाऱ्यासोबत भांडणांविषयी माहिती दिली, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर बहाद्दूर याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.