मुंबई: मालाड येथे प्लास्टिक बॅगमध्ये गुंडालेल्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ
Representational Image | (Photo Credits: ANI)

मुंबईतील (Mumbai) मालाड (Malad)  येथे प्लास्टिक बॅगमध्ये आज (6 ऑगस्ट) एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून ती जवळपास 35 वर्षीय असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मढ गावातील किनाऱ्याजवळ एका महिलेचा मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाललेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी मालवणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तसेच मृत महिलेची ओखळ अद्याप पटली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(खारघर येथील पांडवकडा धबधब्यात वाहून गेलेल्या 4 तरुणींचे मृतदेह सापडले)

मृत महिलेचा मृत्यू भागवती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलिसांकडून केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी पांडवकडा येथील धबधब्यात चार जणी वाहून गेल्याची घटना घडली होती.