Mumbai Local Train Update: आनंदाची बातमी! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून सर्व महिलांना मुंबई लोकलमधून करता येणार प्रवास
(Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Women Allowed to Travel in Local Trains: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवतील कर्मचाऱ्यांना वगळता इतर लोकांना अद्यापही मुंबई लोकलमधून (Mumbai Local Train) प्रवास करण्याची परवानगी नाही. यामुळे सर्वसामान्य लोकांनाही मुंबई लोकलमधून प्रवास देण्यात यावा, अशी विनंती केली जात आहे. यातच मुंबई आणि एएमआरमधील सर्व महिलांना येत्या 17 तारखेपासून लोकमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी क्यूआर कोडचीही गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, सकाळी 11 ते 3 आणि सांयकाळी सात वाजल्यापासून शेवटच्या लोकपर्यंत महिलांना प्रवास करता येणार आहे. परंतु, लोकलमधून प्रवास करण्यासाठी पुरुष मंडळींना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूभीवर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता. परिणामी, राज्यातील उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतूकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. मात्र, राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनलॉकच्या अंतर्गत टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी पुन्हा सुरु होत आहेत. दरम्यान, मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल ट्रेन कधी सुरु होणार? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. यातच मुंबई लोकलमधून अत्यावश्यक सेवीतील कर्मचाऱ्यांसह सर्व महिलांना प्रवास करता येणार, अशी माहिती मिळत आहे. हे देखील वाचा- रेल्वेस्थानकात Face Mask घालणे टाळतायत? होऊ शकतो 5 वर्षांचा तुरुंगवास

अ‍ॅड. जयेश वाणी यांचे ट्विट-

महाराष्ट्र सरकारने याआधी अनलॉक 5 गाईडलाईन्स अंतर्गत मुंबईच्या डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. सध्या महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट कायम असून खबरदारीचा उपाय म्हणून टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी सुरु करण्यात येतील, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवला होता.