Coronavirus Pandemic (Photo Credits: IANS)

सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातल्याने त्यासंदर्भातील नियम आणि अटींचे पालन करणे अनिवार्य आहे. मात्र काही जणांकडून नियमांचे वारंवार उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. याच कारणास्तव आता नियमांची पायमल्ली करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरवात केली गेली आहे. याच पार्श्वभुमीवर आता जर तुम्ही रेल्वेस्थानकात किंवा त्याच्या परिसरात सोशल डिस्टंन्सिंगसह (Social Distancing)  मास्क (Face Mask) घालण्याचे टाळत असल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते.(खुशखबर! उद्यापासून 453 वरून 481 नव्या उपनगरीय रेल्वे सेवा सुरु होणार; Central Railway ची घोषणा)

कोरोनाच्या काळात रेल्वेस्थानकात मास्क न घालणे किंवा सोशल डिस्टंन्सिंग न पाळल्यास पहिल्या वेळेस व्यक्तीकडून 250 रुपयांचा दंड स्विकारला गेल्याचे मध्य रेल्वेचे चीफ पब्लिक रिलेशन्स ऑफिसर शिवाजी सुतार यांनी सांगितले हे. दुसऱ्या वेळेस एका महिन्याचा तुरुंगावासाची शिक्षा, तिकिट जप्त करण्यासह कलम 140 अंतर्गत 250 रुपयांचा दंड ही वसूल केला जाणार आहे. मात्र त्याच व्यक्तीने पुन्हा तिच चूक केल्यास त्याला कलम 154 अंतर्गत एका वर्षाचा तुरुंगावास भोगावा लागेल अथवा कलम 153 अंतर्गत 5 वर्षांची ही शिक्षा सुनावली जाऊ शकते.

त्याचसोबत पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, ज्या व्यक्ती रेल्वे स्थानकाच्या परिसरात मूत्रविसर्जन किंवा थुंकताना दिसून आल्यास त्यांच्यावर ही कारवाई केली जाणार आहे. तर कोरोनाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसंबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर योग्य ती अॅक्शन घेतली जाणार आहे.(Maharashtra Mission Begin Again: 15 ऑक्टोबर पासून Metro Rail, ग्रंथालयं सुरू करण्यास परवानगी; अनलॉक बाबत नवे परिपत्रक जारी)

तर रेल्वेने प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता सामान्य नागरिकांना त्यामधून प्रवास करण्याची अद्याप परवानगी नाही आहे. तर मंगळवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एका बैठकीत असा विचार करण्यात आला आहे की, 30 टक्के संख्यने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा दिली जाऊ शकते. मात्र जर बहुसंख्येने लोकांनी पुन्हा गर्दी करत प्रवास केल्यास त्याचे परिणाम वाईट होण्यासह कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होईल हे नक्कीच असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.