कोरोना व्हायरस सोबत सामना करत मुंबईकर पुन्हा आपलं जीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशामध्ये आता 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून काहीशा प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने नवी नियमावली जारी करत राज्यात 15 ऑक्टोबरपासून काही नियम शिथिल करत पुन्हा अधिक व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये मुंबई मध्ये मेट्रो (Mumbai Metro Rail) सेवा टप्प्या टप्प्याने सुरू होणार आहे. येत्या काही दिवसात नगरविकास विभाग त्यासाठी SOP जारी करेल. खाजगी आणि सरकारी ग्रंथलयं (Public Libraries) सुरू होतील. कंटेन्मेंट भाग वगळता इतर ठिकाणी दुकानं सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत खुली राहणार आहेत. दरम्यान शाळा, महाविद्यालयं मुंबईमध्ये पुन्हा सुरू करण्याला परवानगी दिली नसली तरीही 50% शिक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. कंटेन्मेंट भागाबाहेरील आठवडी बाजार सुरू राहील. इथे पहा अनलॉकचं नवं पत्रक.
मुंबईत लोकल आणि रस्ते वाहतूकीवर निर्बंध असल्याने त्यावर ताण आणि गर्दी होती. पण सोशल डिस्टंसिंग पाळत आता मुंबई शहरामध्ये मुंबई मेट्रो पुन्हा धावायला सुरुवात होणार आहे. 19 ऑक्टोबरपासून मुंबई मेट्रो पुन्हा सुरू केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. Maharashtra Unlock 5 Guidelines: महाराष्ट्र सरकारने जारी केल्या अनलॉक 5 च्या मार्गदर्शक सूचना; राज्यात 50 टक्के क्षमतेसह हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि बार उघडण्यास परवानगी.
मुंबई मेट्रो 19 ऑक्टोबर पासून धावणार
@MumMetro is thankful to Government of Maharashtra for allowing metro operations. We have already initiated safety inspections and trial runs, and are set to restart passenger operations from Monday, 19th October 2020, 8:30 am. #MissionBeginAgain #HaveANiceDay
— Mumbai Metro (@MumMetro) October 14, 2020
आता सणासुदीचा काळ आहे त्यमध्ये खरेदी-विक्री सुरू होईल त्यामुळे दुकानदार आणि नागरिकांच्या सोयीसाठी आता दुकानं देखील 12 तास खुली राहणार आहेत. ही शिथिलता जरी देण्यात आली असली तरीही सोशल डिस्टंसिंगचे नियम आणि SOP देखील जारी केली जाणार आहे. त्याचं पालन करतच मुंबई मध्ये पुन्हा व्यवहार सुरू केले जातील.
मुंबईमध्ये गणेशोत्सवानंतर वाढलेली रूग्णसंख्या आता पुन्हा नियंत्रणात येण्यास सुरूवात झाली आहे. दरम्याम मुंबई शहरामध्ये आता रूग्ण दुप्पटीचा दर 71 दिवस झाला आहे. तर रूग्ण बरे होण्याचा दर 85% पर्यंत पोहचला आहे. कालपर्यंत शहरामध्ये 21,841 जणांवर उपचार सुरू आहेत.