Mumbai Local Trains | Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: ANI)

Mumbai Local Train Update:  आज ठाणे आणि दिवा स्थानकादरम्यान 18 तासांसाठी लोकल सेवा बंद ठेवली जाणार आहे. सेंट्रल रेल्वेच्या मते, रेल्वे मार्गावर कंस्ट्रकशनचे काम केले जाणार आहे. ठाणे-दिवा कॉरिडोरवर इंफ्ट्रास्ट्रक्चर ब्लॉक रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे. यामुळे ट्रेनच्या मार्गात ही बदल करण्यात आला आहे. धिम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी आणि कल्याण, दिवा आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत.

मध्य रेल्वेने असे म्हटले आहे की, 7.47 ते 23.5 पर्यंत कल्याणवरुन सुटणाऱ्या सीएसएमटीसाठी अप स्लो/सेमी फास्ट सेवा दिवा आणि मुलुंड दरम्यान अप फास्ट लाइनवर वळवल्या जाणार आहेत.यामुळे मुंब्रा आणि कळव्यात लोकल सेवा बंद राहणार आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीदरम्यान बस चालवण्याची व्यवस्था केली आहे. तर जाणून घ्या कोणत्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.(BMC Warns To People: मुंबईतील नागरिकांना सणासुदीच्या आठवड्यापूर्वी बीएमसीचा इशारा, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करणार)

-11007/11008 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस

12109/12110 मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस

12071/12072 मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस

11401 मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस

12123/12124 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन

12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस

11139 मुंबई-गडग एक्सप्रेस

17612 मुंबई-नांदेड़ एक्सप्रेस

11029 मुंबई-कोल्हापुर कोयना एक्सप्रेस

-20 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आलेल्या गाड्या

11402 आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस

11140 गडग-मुंबई एक्सप्रेस

प्रवाशांची कोणताही गैरसोय होऊ नये म्हणून या मार्गांवर स्पेशल बस सुद्धा चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करण्यापूर्वी लोकल ट्रेनचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे.