Mumbai Local Train: लोकलचा जीवघेणा प्रवास; ३ महिन्यांत लोकलमधून पडून तब्बल १३९ लोकांचा मृत्यू
Mumbai Local Train | (File Image)

Death After Falling From Local Train: मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चाकरमानी दररोज लोकलचा प्रवास करत असतात. म्हणूनच लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हणतात. दररोज कोट्यावधी प्रवासी लोकलने प्रवास करत आहेत. मात्र, त्यातच गेल्या ३ महिन्यांत लोकलमधून (Mumbai Local Train) पडून जीव गमावलेल्यांची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन महिन्यात तब्बल १३९ लोकांचा ट्रेनमधून पडून मृत्यू (Passengers Death) झाला आहे. ही आकडेवारी पाहून अनेकांच्या बुवया उंचावल्या आहेत. लोकलच्या मर्यादित फेऱ्यांमुळे नागरिकांवर ट्रेनमध्ये गर्दीत जीवघेणा प्रवास (Mumbai News) करावा लागतो. परिणामी यात अनेक जण खाली पडून मरतात. (हेही वाचा : Mumbai Local Train: शंभरपेक्षा जास्त लोकल रद्द झाल्याने मुंबईकरांचे हाल, जाणून घ्या कारण)

लोकसत्ताच्या हवाल्यानुसार, जानेवारी ते मार्च २०२४ या कालावधीमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण ५६५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी मिळत आहे. यामध्ये गर्दी हे एक प्रमुख कारण आहे. त्यातही गर्दी असल्यामुळे लोकलमधून पडून १३९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अवधेश दुबे या तरूणाचा देखील लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर, रीया नावाच्या तरूणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला होता.

ट्रेन मिस झाली तर, कामावर जायला लेट होईल, हाफ डे लागेल, याची भिती कामगार वर्गाला असते. त्यामुळे कितीही गरर्दी असली तरी, ते जीवाची बाजी लावत ट्रेनमध्ये चढत असतात. काहीवेळा त्यांना वाईट प्रसंगाना सामोर जावं लागतं. लोलकमधून पडून अनेक प्रवासी आजवर अपंग झाले आहेत. शेकडोंनी मृत्यूला कवटाळले आहे.

लोकलच्या मर्यादित फेऱ्या, विस्कळीत वेळापत्रक, प्रवाशांची प्रचंड वाढती गर्दी यामुळे मुंबईकर खूप आधीपासून कंटाळले आहेत. कल्याण-बदलापूर-कर्जत, कल्याण- आसनगाव-कसारा या मार्गांचा विस्तार आणि कळवा-ऐरोली उन्नत मार्ग हे रेल्वे प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे लोकलच्या फेऱ्यांवर मर्यादा आल्या आहेत.