Mega Block | (File Image)

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेने कसारा रेल्वे स्थानकात उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी मुंबईत पुढील दोन दिवस  मध्य रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक असणार आहे.मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकावर आरओबी गर्डरच्या (टप्पा-1) लाँचिंगसाठी हा  विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक आहे.  शनिवारी 8 मार्च आणि रविवारी 9 मार्च रोजी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात प्रवाशांनी लोकलने प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रक पाहूनच नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.या ब्लॉकचा लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे कसारा येथून शनिवारी आणि रविवारी सकाळी 11.10 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (एन-16) लोकल आसनगाव येथून सुटेल. ब्लॉक काही लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

लोकलचे वेळापत्रक 

 शनिवारी 8 मार्च रोजी कसारा स्थानक:  सकाळी 11.40 ते दुपारी 12.10 वाजेपर्यंत (अप आणि डाऊन ईशान्य मार्गांवर)
रविवारी 9 मार्च रोजी कसारा स्थानक:  सकाळी 11.40 ते दुपारी 12.10 वाजेपर्यंत आणि दुपारी 4.00 ते संध्याकाळी 4.25 वाजेपर्यंत (अप आणि डाऊन ईशान्य मार्गांवर)
तसेच कसारा येथून रविवारी संध्याकाळी 4.16 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (एन-26) लोकल कल्याण येथून सुटेल.
मेगा ब्लॉक 

माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत

 ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.

स. 11.10 ते सायं. 4.40 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक