Leopard Attack On Women: गोरेगाव मधील आरे डेअरी येथे चौथ्यांदा एका बिबट्याने स्थानिक महिलेवर हल्ला केल्याने जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याआधी सुद्धा बिबट्याने एका मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या मुलाला स्थानिकांनी बिबट्याच्या तावडीतून सोडवले होते. आता घडलेली घटना ही आरे डेअरी येथील विसावा येथील असल्याचे सांगण्यात आले आहे.(Leopard Cub Rescued Rrom Aarey Colony: स्थानिकांच्या मदतीने भर पावसात मुंबईत रस्त्यावर भरकटलेल्या बिबट्याच्या बछड्याची सुखरूप सुटका)
सीसीटीव्ही फुटेज मध्ये असे दिसून आले की, एका घराबाहेर बिबट्या बसला आहे. तर हातात काठी असलेली महिला घराबाहेर येत वरांड्यावर बसते. तोच बिबट्या तिच्यावर हल्ला करतो. महिलेने बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या चेहऱ्याला, पाठीला आणि छातीला जखमा झाल्या आहेत. बिबट्याने हल्ला केलेल्या महिलेचे नाव निर्मला रामबदान सिंग (55) असे आहे.
Tweet:
#WATCH | Mumbai: A woman barely survived an attack by a leopard in Goregaon area yesterday. The woman has been hospitalised with minor injuries.
(Visuals from CCTV footage of the incident) pic.twitter.com/c1Yx1xQNV8
— ANI (@ANI) September 30, 2021
वनविभागाचे प्रभारी गजानन हिरे यांनी असे म्हटले की, पंजाचे ठसे दाखवून देतात की, सब-अडल्ट बिबट्याने हल्ला केला आहे. बिबट्याने पहिला हल्ला एका महिन्यापूर्वी केला होता. त्यानंतर वनसंरक्षक अधिकाऱ्यांच्या परवानगीने त्याला पकडण्यासाठी जाळ्या लावण्यात आल्या. तसेच सर्व प्रोटोकॉलचे सुद्धा पालन केले गेले.(Leopard Attack in Aarey Colony: मुंबईत आरे कॉलनी परिसरात सतर्क नागरिकांमुळे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला 4 वर्षीय चिमुकला)
दरम्यान, वनविभागाकडून आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावले गेले आहेत. तर महिलेलवर नुकताच झालेला हल्ल्याच्या ठिकाणची बाब सुद्धा सीसीटी मुळे कळली. मात्र आणखी कॅमेरे लावले जाणार असून आणखी किती सब-अडल्ट आहेत ते पाहिले जाईल असे त्यांनी म्हटले.