मुंबई: जेजे पोलीस स्थानकातील 3 कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी यशस्वी लढा, कामावर पुन्हा रुजू होताना पाहून केली पुष्पवृष्टी (Watch Video)
जेजे पोलीस स्थानकातील 3 जणांचा कोरोनाशी यशस्वी लढा (Photo Credits-ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यिकय कर्मचाऱ्यांकडून उपचार करण्यात येत आहेत. दुसऱ्या बाजूला पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा अहोरात्र रस्त्यावर गस्त घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. परंतु त्यांना सुद्धा कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समोर येत आहेत. मात्र आता कोरोनाच्या विरोधात यशस्वी लढा देऊन पुन्हा कामावर रुजू होणाऱ्या जेजे स्थानाकातील तीन कर्मचाऱ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच कर्मचाऱ्याचे आनंदात स्वागत करण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात पोस्ट करण्यात आला आहे.(मुंबई: कोरोनावर मात करून आलेल्या ASI किरण पवार यांचंं स्वागत टाळ्या, पुष्पवर्षावाने Watch Video)

महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे सध्या कोरोनाची परिस्थिती मधील कार्य बहुमोलाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे आदेश काटेकोरपणे पाळत घरी थांबावे असे वांरवार त्यांना आवाहन करण्यात येत आहे. पोलीस दलातील आतापर्यंत 1 हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 15 पेक्षा अधिक पोलीस वीरांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.(ठाणे: श्रीनगर पोलीस स्टेशन येथील कॉन्स्टेबल प्रतिभा गवळी यांचा कोरोना व्हायरसशी झुंज देताना मृत्यू)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 1600 पेक्षा अधिक आहे. काल पोलिस खात्याकडून दिलेल्या महितीनुसार, 48 तासात 278 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. दरम्यान मुंबई पोलिस खात्यातील कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 60 लाखाची मदत केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.