मुंबईतील (Mumbai) दादर (Dadar) येथील चैत्यभुमीवर (Chaitya Bhoomi) अखंड भीमज्योत लवकरच उभारण्यात येणार आहे. यासाठी आता राज्य सरकारने मंजूरी दिली असून येत्या 15 दिवसात येथे भुमीपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. तसेच भुमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तर मंत्रालयात अखंड भीमज्योत उभारण्याचा निर्णय घेण्यापूर्वी बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी बैठकीला चैत्यभुमीचे समन्वय समितीचे सदस्य, कालिदास कोळंबकर, महापालिका अधिकारी यांच्यासह वरिष्ठ मंडळींनी या बैठकीला उपस्थिती लावली होती.
तसेच फोर्टला सुद्धा हुतात्मा चौकाच्या येथे ही भीमज्योत उभारण्यात येणार आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि पुण्यतिथी निमित्त हजारोंच्या संख्येने त्यांचे अनुयायी दादर येथील चैत्यभुमीवर दर्शनासाठी येतात. त्यामुळे अखंड ज्योत उभारणी केल्यास त्याला ही त्यांना अभिवादन करु शकता येईल असे बोलले जात आहे.