Former NCP leader Chitra Wagh join Bharatiya Janta Party | (Photo Credits: ANI)

भाजप मेगा भरती 2019:  शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ, संदीप नाईक, वैभव पिचड, कालिदास कोळंबकर यांच्यासह काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातील अनेक नेत्यांनी आज भाजप (BJP) मध्ये प्रवेश केला. या प्रवेशाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेली अनेक दिवस सुरु असलेल्या चर्चेला आजच्या भाजप मेगा भरती 2019 च्या निमित्ताने अखेर पूर्णविराम मिळाला. राज्यात आणि केंद्रात दिर्घकाळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी आज (बुधवार, 31 जुलै 2019) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

मुंबई येथील गरवारे क्लब येथे भाजपाचा हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या भव्य पक्षप्रवेशाचा उल्लेख राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर भाजप मेगा भरती 2019 (BJP Mega Recruitment 2019) असा केला जात आहे. या पक्षप्रवेसामुळे आजचा दिवस हा भविष्यातील महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे. आजच्या पक्ष प्रवेशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांचा समावेश असल्याने राज्यातील विरोधी पक्षांना प्रचंड मोठी राजकीय किंमत चुकवावी लागणार आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते

भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेते/आमदार

 

नेता/आमदाराचे नाव मतदारसंघ/कार्यक्षेत्र राजकीय पक्ष
संदीप नाईक (गणेश नाईक यांचे पूत्र) ऐरोली विधानसभा मतदारसंघ (नवी मुंबई) राष्ट्रवादी काँग्रेस
शिवेंद्रराजे भोसले जावळी विधानसभा मतदारसंघ (सातारा) राष्ट्रवादी काँग्रेस
वैभव पिचड अकोले विधानसभा मतदारसंघ (नगर) राष्ट्रवादी काँग्रेस
कालिदास कोळंबकर वडाळा विधानसभा मतदारसंघ (मुंबई) राष्ट्रीय काँग्रेस

मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज आहेत. त्यात काही विद्यमान आमदारही आहेत. ज्यांनी नुकताच आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला. (हेही वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणातील धक्कादायक दिवस; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गजांचा आज भाजप प्रवेश; जाणून घ्या प्रमुख चेहरे)

एएनआय ट्विट

दरम्यान, भाजपमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप हे दबावाचे राजकारण करत असून, त्या माध्यमातूनच ते विरोधी पक्ष फोडत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर, या आरोपाला प्रत्युत्तर देताना भाजपने म्हटले आहे की, भाजप हा कोणताही पक्ष फोडत नसून, भाजपचे विचार आवडल्याने इतर पक्षातील लोक स्वत:हून पक्षात आकृष्ट होत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना प्रवेश देत आहोत, असे म्हटले आहे.