Mumbai: प्रभादेवी परिसरात असलेल्या प्रसिद्ध श्री. सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना बनावट QR कोडची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात मंदिर न्यासचे उपमुख्य कार्यकारी यांनी पोलिसात धाव घेत एफआयआर दाखल करुन या प्रकरणी तपास सुरु केला आहे.(Alibag Parasailing Accident: वरसोली समुद्र किनारी पॅरासिलिंग करताना दोर तुटला; 2 महिला सुदैवाने बचावल्या)
दादर पोलिसांना सुचना मिळाली होती की, गेल्या काही दिवसांपासून मंदिर परिसरात अवैध रुपात क्यूआर कोडची विक्री केली जात आहे. तपासानुसार 30 नोव्हेंबरला मंदिर परिसरात एका वृत्तपत्राच्या रिपोर्टरला एक क्यूआर कोड विक्री केला गेला. याची तक्रार पत्रकाराने मंदिर प्रशासनाला केली. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.(Mumbai: महापरिनिर्वाण दिनानिमिमित्त वाहतूकीसाठी मुंबई पोलिसांकडून निर्बंध, वाचा येथे अधिक)
दरम्यान, कोरोनाच्या काळात ट्रस्ट द्वारे सिद्धीविनायक अॅपच्या माध्यमातून क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे गर्दी होणार नाही आणि कमी संख्येने भक्तांना मंदिरात येऊन बाप्पाचे दर्शन घेता येईल. दर्शन घेण्यासाठी भाविकांना क्यूआर कोड पाहिजे असल्यास त्यांना मंदिराचे अधिकृत अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्याचसोबत क्यू आर कोड हा फ्री असून नागरिकांकडून दर्शनासाठी कोणताही शुल्क आकारला जात नाही. परंतु आरोपींकडून या कंप्युटर सिस्टिमचा फायदा घेत अवैध रुपात क्यूआर कोडची विक्री करत होते.