Mumbai: महापरिनिर्वाण दिनानिमिमित्त वाहतूकीसाठी मुंबई पोलिसांकडून निर्बंध, वाचा येथे अधिक
Chaityabhoomi Dadar (File Image)

Mumbai: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या 6 डिसेंबरला आहे. त्यामुळे मुंबईतील दादर येथील चैत्यभुमीवर दरवर्षी हजारोंच्या संख्येने बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना वंदन करण्यासाठी येत असतात. परंतु महानिर्वाण दिनामित्त मुंबई पोलिसांकडून 4 डिसेंबर पासून वाहतूकीसाठी निर्बंध घालण्यात येणार आहेत. ते निर्बंध 7 डिसेंबर पर्यंत लागू असणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.(Traffic Fines Increased: महाराष्ट्र सरकारने वाहतूक गुन्ह्यांसाठी वाढवला दंड, आता नियम तोडल्यास इतकी किंमत मोजावी लागणार)

निर्बंधनानुसार, सिद्धविनायक जंक्शन येथे जाण्यासाठी एस्.के. बोले रोड हा वन वे असणार आहे. त्याचसोबत हनुमान मंदिराच्या येथून सुद्धा प्रवेश दिला जाणार नाही आहे. त्याचसोबत भवानी शंकर रोड हा हनुमान मंदिर किंवा दादर कबुतरखाना रोड सुद्धा वन वे असणार आहे. गोखले रोड साउथ मार्गे गोपीनाथ चव्हाण चौकाच्या येथून सुद्धा प्रवेश नसणार आहे. परंतु बेस्ट बस आणि आपत्कालीन सुविधांच्या वाहनांना परवानगी असणार आहे.

एसवीएस रोड हा सिद्धिविनायक येथून ते हिंदूजा रुग्णालयापर्यंत वाहतूकीसाठी बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांना हिंदुजा रुग्णालयावरुन पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन म्हणजेच रोड क्रमांक 5 च्या येथून स्थानिकांना जाता येणार आहे. अन्य अवजड वाहतूक गाड्या यांना माहिम जंक्शन व्हाया मोरी रोड ते सेनापटी बापट मार्गावरुन जाता येणार आहे. यामध्ये बसला सूट दिली जाणार आहे.(Maharashtra Government Holidays 2022: महाराष्ट्रातील शासकीय सार्वजनिक सुट्ट्यांची पुढील वर्षासाठी लिस्ट जाहीर, येथे पहा)

तर 3-5 डिसेंबर दरम्यान चैत्य भुमीजवळचा परिसर हा नो पार्किंग झोन असणार आहे. परंतु नऊ जागा या पार्किंगसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये माहिम येथील सेनापटी बापट मार्ग, दादर आणि रेती बंदर यांचा समावेश असणार आहे. वाहतूकीचे निर्बंध शनिवार दुपार पासून ते येत्या मंगळवार पर्यंत लागू असणार आहेत.