पंजाब महाराष्ट्र बॅंकेच्या (PMC) गैर व्यवहाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राकेश वाधवान (Rakesh Wadhawan), सारंग वाधवान (Sarang Wadhawan), वायराम सिंग यांच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ झाली आहे. आज न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये या तिघांच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ झाली आहे. न्यायालयाने 16 ऑक्टोबर पर्यंत त्यांना पोलिस कोठडी ठोठावली आहे. वाधवान पितापुत्र हे एचडीआयएलचे (HDIL) प्रमोटर आहेत. तर वायराम सिंग ( Waryam Singh) हे माजी व्यवस्थापक आहेत. मुंबई: PMC बॅंक खातेदारांची कोर्टाबाहेर घोषणाबाजी; राकेश वधवान, सारंग वाधवान यांना जामिन न देण्याची मागणी
पीएमसीकडून एचडीआयएलला कर्ज देण्यात आले होते, मात्र एचडीआयएलने कर्जाची रक्कम वेळेत न भरल्याने पीएमसी बँक आणि बँकेतील खातेदार आता अडचणीत आले आहेत.बँकेला 4355.43 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याबद्दल हा एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
ANI Tweet
Maharashtra: Accused in PMC Bank case, Rakesh Wadhawan, Sarang Wadhawan and Waryam Singh being brought out of Mumbai's Esplanade court. The court has sent them to police custody till 16th October in the case. pic.twitter.com/WDcC9hk1UA
— ANI (@ANI) October 14, 2019
आरबीयाने पीएमसी बॅंकेवर आर्थिक निर्बंध घातल्याने खातेदारांना पैसे काढण्यावर मर्यादा आली आहे. तसेच कर्ज आणि बॅंकेच्या इतर सोयींपासून त्यांना लांब ठेवण्यात आले आहे. सध्या सहा महिन्यांसाठी 25,000 रूपये काढण्याची मुभा पीएमसी बॅंक धारकांना देण्यात आली आहे.