Accident (PC - File Photo)

मुंबई (Mumbai)  मध्ये शुक्रवारी रात्री एक भयंकर अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेली इर्टिगा कार (Ertiga Car Accident) खांब्यावर धडकल्याने गाडीचे दोन तुकडे झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या अपघातामध्ये कारमधील 5 जण जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलींचा समावेश आहे. या अपघातानंतर गाडीची झालेली अवस्था भयावह आहे.

11 ऑगस्टच्या रात्री चेंबुकडे जात असताना कुर्लाच्या SCLR पुलावर हा भीषण अपघात झाला आहे. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट खांबावर आदळली. कार दोन तुकड्यात विभागली गेली. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल तासाभराच्या शर्थीनंतर गाडीतील सार्‍यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने राजावाडी रूग्नालयामध्ये दाखल करण्यात आले.

गाडीमध्ये 5 जण प्रवास करत होते. सुदैवाने यामध्ये कोणीही दगावले नाही मात्र त्यांना जबर मार लागल्याने दुखापती गंभीर आहेत. पाचही जणांवर राजावाडी पोलिस स्टेशन मध्ये उपचार सुरू आहेत. यामध्ये 2 मुलींचा समावेश आहे. नक्की वाचा: Mira-Bhayandar Road Rage: कारने दुचाकीला दिली जोरदार धडक, तरुणाचा मृत्यू; आरोपीवर गुन्हा दाखल .

मुंबई मध्ये रात्रीच्या वेळेस अपघात टाळण्यासाठी पोलिस पेट्रोलिंग सुरू असते. तसेच सध्या पावसापाण्याचे दिवस असल्याने गाडी सावकाश चालवण्याचे आवाहन केले जाते. खड्ड्यांमुळेही अनेक ठिकाणी मुंबईत अपघात होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.