मुंबईच्या (Mumbai ) दादर (Dadar) येथील इंदू मिल (Indu Mill) जागेवर होणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (Mumbai Dr BR Ambedkar Memorial) जनतेसाठी 2023 पर्यंत खुले होईल, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांनी इंदू मिलला बुधवारी भेट दिली या वेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी ते म्हणाले, आंबेडकर स्मारकाचे काम मोट्या गतीने सुरु आहे. हे काम 2023 पर्यंत पूर्ण होईल. त्याच वर्षी 14 एप्रिल 2023 या दिवशी हे स्मारक जनतेसाठी खुले होईल. 14 एप्रिल या दिवशी आंबेडकरांची जयंती असते.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर बोलताना धनंजय मुंडे यांनी डॉ. आंबेडकर अनुयायांना अवाहन केले. धनंजय मुंडे म्हणाले की, 6 डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वान दिन असतो. या दिवशी राज्य, देश आणि जगभरातून असंख अनुयायी चैत्यभूमीवर वंदन करण्यासाठी मुंबईत दाखल होत असतात. परंतू, यांदा परिस्थीती वेगळी आहे. कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका अद्यापही टळला नाही. त्यामुळे नागरिकांनी आणि अनुयायांनी राज्य सरकारच्या नियम, अवाहनांचे पालन करावे. चैत्यभूमीवर गर्दी करु नये. त्या ऐवजी सर्वांनी आपापल्या घरी थांबून आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करावी, वंदन करावे. जेणेकरुन गर्दी होणार नाही आणि कोरोनाचा धोका वाढणार नाही. (हेही वाचा, Smart City Nashik, Victoria Bridge: नाशिक येथील अहिल्याबाई होळकर पुलाचे सेन्सर देणार 'धोक्याचा अलर्ट')
अधिक माहिती देताना धनंजय मुंडे म्हणाले की, सरकारी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि काही खासगी दूरचित्रवाणी वाहिन्या या चौत्यभूमीवरील कार्यक्रम लाईव्ह दाखवतात. त्यामुळे प्रत्यक्ष चैत्यभूमीवर गर्दी न करत सर्वांनी घरुनच या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असेही मुंडे म्हणाले.