Arrest | (Representative Image)

मुंबई पोलिसांनी हिरे व्यापारी (Diamond Merchant) शालिन शाह (42) यांना जवळपास 22 कोटी रुपये किमतीच्या मौल्यवान रत्नांच्या प्रकरणात फसवणूक केले प्रकरणी अटक कली आहे. आरोप आहे की, सालिन शाह यांनी आणखी एक व्यापारी हरेश कासोदरिया आणि त्यांच्या पत्नीकडून कोट्यवधी रुपये घेतले. मात्र, ना त्यांना मौल्यवान रत्न म्हणून ओळखले जाणारे हिरे (Diamond ) दिले ना त्यांची रक्कम परत केली. या फसवणूक प्रकरणात पती शालिन शाह यांना मदत केल्याप्रकरणी त्यांची पत्नी जल्पा (39) हिलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांकडे प्राप्त तक्रारीनुसार आरोपी शालिन शाह याने ग्राहकास विक्री करण्याच्या उद्देशाने कासोदरिया यांच्याकडून गेल्या वर्षी मार्च (2023) मध्ये 3,062 कॅरेटचे हिरे घेतले होते. ज्याची बाजारातील किंमत कट्यवधी रुपये आहे. दरम्यान, बराच काळ उलटून गेला तरी त्यांनी हिरे किंवा हिऱ्यांची किंमत असणारी रक्कमही परत केली नाही. हिरे धातूचा दगड किंवा त्याच्या किमतीएवढ्या रकमेची परतपफेड न केल्याने तक्रारदाराने आपली फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. आरोपी आणि तक्रारदार दोघेही हिऱ्यांचे व्यापारी असून पाठिमागील सात वर्षांपासून या व्यवसायात गुंतले आहेत. कासोदरिया यांनी पाठिमागील काही वर्षांच्या संबंधांतून व्यापारी शाह यांच्यावर विश्वासठेवला आणि व्यवहार केला. पण पदरी फसवणूक आली. (हेही वाचा, Diamond Industry Growth: कोरोना काळातही हिरे उद्योगात तब्बल 22 टक्क्यांनी वाढ)

तक्रारदाराने म्हटले आहे की, शालिन शाह यांनी पठिमागच्या वर्षी सप्टेबर महिन्यामध्ये आपली संपूर्ण रक्कम 120 दिवसांच्या आत परत करण्याचे अश्वासन देऊन पुन्हा एकदा 8.9 कोटी रुपयांचे किमतीचे अतिरिक्त हिरे घेतले होते. तथापि, विक्रीच्या रकमेसाठी वारंवार विनंती करूनही, शहा यांनी सबबी सांगितली आणि अखेरीस सर्व संवाद बंद केला. रक्कम परत केलीच नाही. दरम्यान, आपण केलेल्या चौकशीमध्ये वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील शाह यांचे कार्यालय प्रदीर्घ अनिश्चित कालावधीसाठी बंद असल्याचे कासोदरिया यांना समजले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे आपल्या लक्षात आले आणि आपण पोलिसांमध्ये तक्रार दिली. (हेही वाचा, गुजरात येथे मुकबधिर असल्याचे नाटक करत भामट्याने पळवले 40 लाख रुपयांचे हिरे)

दरम्यान, पोलिसांनी अटक केल्यानंतर झालेल्या चौकशीदरम्यान शालिन शाह यांनी सांगितले की, फसवणूक करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. घेतलेले हिरे आपण ग्राहकाला विकले आहेत. मात्र, त्याच्याकडून आपल्याला त्या हिऱ्यांची किंमत मिळाली नाही. दरम्यान, पोलिसांनी शाह यांच्या पत्नीकडून 5 लाख रुपये किमतीचा एक दगड जप्त केला आहे. या दगडामुळेच त्यांना अटक करण्यात आली आहे. शहा आणि त्यांची पत्नी या दोघांवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.