Mumbai Crime : प्रेम प्रकरणांतील गुन्ह्यात सध्या वाढ होताना दिसत आहे. लग्नास नकार दिला म्हणून मालाड(malad)मध्ये एका शिक्षिकेवर लोखंडी सळईने जीवेघणा हल्ला (molestation)करण्यात आला.या शिक्षीकेच्या डोक्याला, डाव्या हात आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. चमन ऊर्फ मोहम्मद हारून इद्रीस (२५) असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी कुरार पोलिसांनी आरोपी तरूणाविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा : Dombivali Crime: डोंबिवलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार )
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी ही शिक्षिका असून ती मालाड पूर्व येथील रहिवासी आहे. ती खासगी कॉम्प्युटर क्लासेसमध्ये शिकवते. आरोपी चमन हा पूर्वीपासूनच पीडितेला त्रास देत होता. त्याचं तिच्यावर एतर्फी प्रेम होतं. शनिवारी पीडित तरूणी क्लासला जाण्यासाठी निघाली होती. तेव्हा आरोपीने तिला रस्त्यावर गाठले आणि माझ्याशी लग्न कर अशी विचारणा केली. मात्र पीडितेने त्याला स्पष्टपणे नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी सळीने तिच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्या तरूणीच्या डोक्याला तसेच डावा हात आणि कंबरेला दुखापत झाली. तिच्यावर सध्या शताब्दी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा : Mumbai Crime: सोशल मीडियावरील मैत्रीने केला घात, नेपाळहून मुंबईत आलेल्या 15 वर्षीय मुलीवर अत्याचार )
शिक्षिकेला भेटताना आरोपी लोखंडी सळई बरोबर घेऊ आला होता. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित होता, असे समजते. याप्रकरणी पीडित तरूणीच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी हत्येचा प्रयत्न, विनयभंग अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.