![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/01/Crime-380x214.jpg)
राज्यात सध्या गुन्हेगारीच्या घटनेत (Crime News)सातत्याने वाढ ही होत आहे. छोट्या छोट्या कारणाने एकामेंकावर हल्ला करण्याच्या घटनेत देखील वाढ झाली आहे. डोंबिवली मध्ये देखील एक असाच प्रकार घडला आहे. पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असलेल्या पतीने चाकूने प्राण घातक हल्ला केल्याची घटना डोंबिवली (Dombivali Crime News) नांदिवली टेकडी परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर (Mumbai) मुंबई येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीवर हल्ला करून पती राजू हिवाळे हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (हेही वाचा - Uttar Pradesh Crime: पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून केली हत्या, आरोपी पती फरार, युपीतील घटना)
नांदिवली टेकडी परिसरात राजू हिवाळे व सुरेखा हिवाळे हे दोन्ही मुलांसह वास्तव्यास होते, राजू हिवाळे हा पत्नी सुरेखा हिच्या चरित्र्यावर कायम संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. दरम्यान आज पहाटेच्या सुमारास देखील या दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून संतापलेल्या राजू याने सुरेखा हिच्या पोटावर चाकूने वार केले. या हल्ल्यात सुरेखा गंभीर जखमी झाली.
या घटनेनंतर पती राजू हा पसार झाला आहे. याप्रकरणी राजू हिवाळे यांच्या मुलाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी राजू हिवाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस राजू याचा शोध घेत आहे.