Rape | File Image

मुंबई क्राईम ब्रांच (Mumbai Crime Branch) कडून एका बलात्काराच्या घटनेमध्ये (Rape Case) 5 वर्ष फरार असलेल्या 25 वर्षीय व्यक्तीला कर्नाटक (Karnataka) च्या म्हैसूर (Mysuru) मधून अटक केली आहे. 2018 साली एका महिलेवर मुंबईच्या विक्रोळी (Vikroli) भागात त्याने बलात्कार केल्याचा आरोप आहे. म्हैसूर मध्ये राहत असताना त्याने आपल्या मूळगावाची चूकीची माहिती आणि नाव बदलून तो राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिस ऑफिसरच्या माहितीनुसार, 2018 साली बलात्कार केल्याचा आरोप असलेला हा व्यक्ती अनुपम दास आहे. मुंबईमध्ये तो खाजगी बस वर चालक म्हणून काम करत होता. 24 नोव्हेंबर 2018 मध्ये तो ठाण्याकडे जात असताना ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर त्याने आपली बस थांबवली. रात्री दीडच्या सुमारास एक महिला बसची वाट पाहत असल्याचं त्याने पाहिलं आणि तिला घरी सोडण्यासाठी मदत करत असल्याचं भासवलं. महिलेला बस मध्ये चढण्यास सांगितलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रस्त्यात तिला मध्येच सोडून तेथून पळ काढला. त्यानंतर पीडीता सकाळी 4 च्या सुमारास विक्रोळी पोलिस स्टेशन मध्ये पोहचली. तिच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करून घेण्यात आला.

हायवे वर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फूटेजवरून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. बसचा रजिस्ट्रेशन नंबर पाहून आरोपीला ओळखण्यात यश आले. पण आरोपी कर्नाटकला पळून गेला होता. त्याच्या पत्त्यावरून तो आसामचा असल्याचं समजलं. 2018, 2019 मध्ये आरोपीच्या मूळगावी पोलिसांनी भेटी दिल्या पण तो सापडला नाही त्यामुळे पोलिस अधिकार्‍यांनी स्थानिक कोर्टात समरी रिपोर्ट दाखल केला. दास यांच्या पोलिस नंबर वरून त्याच्या कुटुंबियांच्या मोबाईल नंबर वरून नंतर मुंबई क्राईम ब्रांच युनिट 7 ने तपास सुरू केला.

कॉल डाटा रेकॉर्ड तपासल्यानंतर पोलिसांना आरोपीचा सुगावा लागण्यास सुरूवात झाली. पोलिस नंतर म्हैसूरला पोहचले. तेथे दास प्लॅस्टिक रिसायकल करत असलेल्या प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला लागला होता. तेथे मालकाला त्याने आपण बिहारचे असल्याचे नाव बदलून सांगितले होते.

पोलिस तपासामध्ये नंतर दास याची ओळख पटली आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. त्याला मुंबई मध्ये आणण्यात आले. विक्रोळी पोलिसांकडे त्याला सुपूर्त करण्यात आले. त्यापुढील कायदेशीर बाबी आता सुरू झाल्या आहेत.