Mumbai crime: पत्नीच्या मदतीने एक्स गर्लफ्रेंडची केली हत्या, मृतदेह फेकला गुजरातच्या खाडीत
Crime (PC- File Image)

Mumbai crime:  एक्स गर्लफ्रेंडची हत्या करून तिचा मृतदेह गुजरातमध्ये फेकल्या प्रकरणी आरोप असलेल्या एका व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला 16सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोहर शुक्ला (34) असे आरोपीचे नाव आहे. 9 ऑगस्ट रोजी एक्स गर्लफ्रेंडची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हत्ये प्रकरणामध्ये पती आणि पत्नी दोघांचा ही समावेश होता. या घटनेमुळे मुंबईत मोठी खळबळ उडाली आहे. तीघांमध्ये एका मुद्दावरून भांडण झाले होते अशी माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या 29 वर्षीय नयना महतची हत्या केली, कारण तिने काही वर्षांपूर्वी त्या व्यक्तीविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केलेली होती. बलात्काराची तक्रार मागे घेण्यास नयनाने नकार दिला होता. या रागाच्या भरात तरुणीची हत्या करण्यात आली. तरुणीवर बलात्कार करून दुसऱ्या महिलेशी आरोपीने लग्न केले होते. आरोपीने बलात्काराची तक्रार मागे घेण्यास दबाव टाकला होता. या मुद्द्यावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत आणि या वादातून त्याने ९ ऑगस्ट रोजी महिलेची हत्या केली.

महिनाभरापूर्वी त्यांच्या नायगाव पूर्व येथील राहत्या घरातून तरुणी बेपत्ता झाली होती. 9 ऑगस्ट रोजीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी त्यांच्या पत्नीसोबत सुटकेस घेऊन महातच्या इमारतीतून बाहेर पडताना दिसत आहेत. दरम्यान, मृत तरुणीच्या बहिणीला या दोघांवर संशय आला. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

चौकशीदरम्यान त्याने पत्नीच्या मदतीने मृतदेह ट्रॅव्हल्स बॅगेत भरल्याची माहिती देत ​​हत्येची कबुली दिली. त्यानंतर ते दोघे गुजरातमधील वलसाड येथे गेले, जिथे मृतदेह असलेला सुटकेस एका खाडीत टाकण्यात आला. यावेळी दाम्पत्याची दोन वर्षांची मुलगीही त्यांच्यासोबत होती.वसईच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी माहिती दिली की १३ ऑगस्ट रोजी मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. डीएनए नमुने काढल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.