मुंबईतील रुग्णालयातून COVID19 च्या रुग्णाने काढला पळ, FIR दाखल
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्याला रुग्णालयात उरचारासाठी दाखल केले गेल्याचे पोलिसांनी म्हटले. मात्र याच रुग्णाने रुग्णालयातून पळ काढला असून त्याच्या विरोधात आझाद मैदान पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला गेला आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, व्यक्तीला भायळखा पोलीस अंतर्गत येणाऱ्या नार्कोटिक्स ड्रग्ज आणि सायट्रोपिक सबस्टेन्स अॅक्ट अंतर्गत गेल्या महिन्यात अटक केली गेली होती.(Pune: विनामास्क गाडी चालकाला अडवल्याने पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न; गाडी अंगावर घालून बोनेटवरून नेले Watch Video)

तर 25 वर्षीय व्यक्तीला राज्य सरकारच्या गोकुळदास तेजपाल रुग्णालयात कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर दाखल केले होते. परंतु व्यक्तीने रुग्णालयातून पळ काढल्याने रुग्णालायातील अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानुसार रुग्णाच्या विरोधात तक्रार दाखल केली गेली आहे.

रुग्णाच्या विरोधात भारतीय संविधानच्या विविध कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच व्यक्तीचा शोधण्याचे काम आणि पुढील तपास अद्याप सुरु असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सध्या कोरोनाच्या रुग्णांचा वेग मंदावला गेला आहे. तरीही नागरिकांनी स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे वारंवार सांगितले जात आहे.(Shirur Molestation Case: विनयभंग करताना नराधमाकडून प्राणघातक हल्ला, महिलेचे डोळे निकामी; पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील घटना)

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 261681 वर पोहचला असून 10377 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. तसेच राज्यात सुद्धा कोरोनाबाधितांचा आकडा हा 1703444 वर जाऊन पोहचला असून 44804 जणांचा बळी गेला आहे.  तर गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपो यांनी म्हटले होते की, जगभरातील अन्य देशात जशी कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्याप्रमाणे ती महाराष्ट्रात येण्याची कमी शक्यता आहे. मात्र जरी कोरोनाची दुसरी लाट आल्यास त्यासाठी सरकार सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.