मुंबईत COVID19 च्या रुग्णांचा आकडा घसरला, रुग्णालयात 85 टक्के बेड रिकामे
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai COVID19 Update: महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर लॉकडाउन लागू केला होता. मात्र राज्यातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होत असल्याने रुग्णालयातील बहुतांश बेड्स सुद्धा रिकामे राहत आहेत. एका रिपोर्ट्सनुसार कोविड19 च्या रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या रुग्णालयात जवळजवळ 85 टक्के बेड हे मुंबईत रिकामे आहेत. या रिकाम्या रुग्णालयातील बेड्सवर आता डॉक्टरांकडून सामान्य रुग्णांवर उपचार करण्याची योजना केली जात आहे. खरंतर कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यात काही सर्जरी थांबल्या आहेत. अशातच डॉक्टरांना या रिकाम्या बेड्सचा वापर त्या रुग्णांसाठी वापर करण्याचा विचार करत आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्ट्सनुसार, मुंबईत 23270 कोविड19 बेड्स मधील जवळजवळ 19,411 बेड्स शुक्रवारी रिकामे होते. त्यामधील 18,100 हून अधिक जंबो, खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयातील बेड्सचा समावेश आहे. अन्य कोविड19 च्या देखभाल केंद्रामध्ये नॉन-क्रिटिकल रुग्णांसाठी होते. जवजवळ 85 टक्के आयसोलेशन बेड्स आणि 55 टक्के आयसीयु बेड्सवर कोणताही रुग्ण नव्हता. रिपोर्टमध्ये असे ही म्हटले आहे की, वेंटिलेटर्सच्या सपोर्टवर असणारे जवळजवळ 47 टक्के बेड्स सुद्धा आरक्षित नव्हते.(मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट मध्ये कोरोनाची परिस्थिती असूनही तुफान गर्दी, पहा फोटो)

तर 9 जुलै रोजी परेल येथील केईएम रुग्णालयात एका सुद्धा कोविड19 रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांनी असे म्हटले की, कोविड19 च्या रुग्णांची आकडेवारी घटल्याने रुग्णालयात 60 टक्के नियमित आरोग्यासंबंधित कामे सुरु झाली आहेत. सध्या आमच्याकडे 500 नॉन-कोविड19 रुग्ण आहेत. शुक्रवारी फक्त 16 रुग्ण होते. पण जर रुग्णांची संख्या वाढली तर बेड्स सुद्धा अधिक उपलब्ध करुन दिले जातील.

एप्रिलमध्ये 19 च्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान महाराष्ट्रात कोविड19 टास्क फोर्सने सुद्धा सर्व रुग्णालयांना निर्देशन दिले होते की, कोविड19 च्या रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी नियमित सर्जरी स्थगित करावी. कारण राज्यात प्रतिदिन 9 हजार कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.