Mumbai: डोळा मारणे आणि फ्लाइंग किस म्हणजे लैंगिक छळ, कोर्टाने आरोपीला सुनावली एका वर्षाची शिक्षा
Court Hammer | (Photo Credits-File Photo)

मुंबईत 20 वर्षीय मुलाने एका अल्पवयीन मुलीला डोळा मारण्यासह फ्लाइंग किस करण्याच्या आरोपाखाली कोर्टाने त्याला 1 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेंसेस (Pocso) अॅक्ट अंतर्गत सुनावण्यात आली आहे. तर 29 फेब्रुवारी 2020 मध्ये एका मुलाने खुप वेळा फ्लाइंग किससह डोळा मारल्याचे त्या 14 वर्षीय मुलीने आपल्या आईला सांगितले. त्यावेळी घरातील मंडळींनी पोलिसात धाव घेत मुलाच्या विरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुलाला अटक केली. तेव्हापासून तो तुरुंगात आपली शिक्षा भोगत आहे.

अटक करण्यात आलेल्या मुलाने ट्रायलच्या दरम्यान कोर्टासमोर असे म्हटले की, मुलगी आणि मी वेगळ्या समजातील असल्याने तिच्या आईने तिच्यासोबत बोलण्यासाठी रोखले. त्याचसोबत त्याला यामध्ये फसवण्यात आले असून त्याने मुलीच्या एका नातेवाईकासोबत शर्थ लावली होती. कोर्टाने मुलगी, तिची आई आणि तपास अधिकाऱ्यांची साक्ष ऐकून घेतली. कोर्टाने या तिघांची साक्ष ही मुलाला शिक्षा देण्यासाठी पुरेशी असल्याचे मानले.(Sex Racket Busted in Vasai: वसईत पोलिसांकडून हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कपलला अटक करत 4 महिलांची सुटका) 

कोर्टाने असे ही म्हटले की, फिर्यादीला लैंगिक छळाचा अपराध सत्य करुन दाखवण्यास अयशस्वी ठरला. कोर्टाने आरोपीला एका वर्षाची शिक्षा ठोठावली. त्याचसोबत कोर्टाने आदेशात असे म्हटले की, जर रेकॉर्डवर जी साक्ष आहे त्यानुसार आरोपीकडून डोळा मारणे किंवा फ्लाइंग किस करणे हा सेक्शुअल संकेत आहे. त्यामुळे या प्रकरणी पीडितेचा लैंगिक छळ झाला आहे. तर घटनेच्या वेळी दोषी 19 वर्षाचा होता त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ शकतो. त्याने केलेला अपराध पाहता त्याला पुढे आयुष्य जगण्यासाठी उदारता दाखवू शकतो. तर नुकसान भरपाई म्हणून पीडितेला 10 हजार रुपये द्यावे असे निर्देशन कोर्टाने दिले आहेत.