Plasma Donation| Image Used For Representational Purpose Only| Photo Credits: IANS

मुंबई सह महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती रूग्ण संख्या आणि दुसरीकडे या जीवघेण्या आजारावर अद्याप ठोस उपचार किंवा लस नसल्याने सामान्यांमध्ये या आजाराबद्दल भीती आहे. मात्र सध्या कोव्हिड 19 मुळे मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी जगभरात गंभीर स्थितीमध्ये असणार्‍यांवर प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतामध्येही विविध राज्यांत ही थेरपी वापरली जात असून महाराष्ट्रात काल पालिका प्रशासनाच्या नायर हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये convalescent plasma trials घेण्यास ICMR कडून परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान कोरोनावर मात केलेल्या रूग्णांच्या शरीरातून रक्तातील प्लाझ्मा काढून त्या उपचार घेत असलेल्या रूग्णाच्या शरीरात चढवून कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी अ‍ॅन्टीबॉडी वाढवल्या जातात. प्लाझ्मा थेरपी म्हणजे नेमकं काय? यामुळे COVID-19 रुग्णांना फायदा होईल? जाणून घ्या प्लाझ्मा थेरपीचे फायदे, इतिहास, उपचारपद्धती याबद्दल सविस्तर माहिती.

TOI च्या वृत्तानुसार, 10 मे ला जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये दक्षिण मुंबईतील नायर हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान नव्याने 28 वैद्यकीय संस्थांना मंजुरी देण्यात आली आहे त्यापैकी महाराष्ट्रातील 6 हॉस्पिटल्सचा समावेश आहे. सध्या देशभरामध्ये प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यासाठी ICMR ची परवानगी घेऊन मग त्यांच्या प्रोटोकॉल नुसारच वापर करणं बंधनकारक आहे. अद्याप प्लाझ्मा थेरपी देखील प्रायोगिक तत्त्त्वावर राबवली जात आहे. त्याचा परवानगी शिवाय वापर करणं घातक आणि बेकायदेशीर असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रातील अजून 15 हॉस्पिटलना अद्याप ICMR कडून परवानगी मिळालेली नाही. प्रतिक्षायादीमध्ये असलेल्या हॉस्पिटलमध्ये आता परेल येथील केईएम हॉस्पिटल सोबतच त्याच कॅम्पसमध्ये असलेल्या Institute of Immunohematology चा समावेश आहे. BMC चे COVID Survivors ना प्लाझ्मा डोनेशचं आवाहन.

सध्या मुंबईच्या नायर हॉस्पिटल ब्लड बॅंकमध्ये कोरोनावर मात केलेल्या रूग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा काढण्याचं काम केले जात आहे. सध्या त्यांच्याकडे 12 युनिट्स असून काही दिवसांपूर्वी त्यांनी लीलावती रूग्णालयात एकाला प्लाझ्मा थेरपी देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या रूग्णाला दुर्देवी अंत झाला. मुंबई पालिका प्रशासनाने कोरोनावर मात केलेल्यांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान ज्यांच्या शरीरात पुरेशा अ‍ॅन्टिबॉडीज मिळतील त्यांच्या शरीरातील रक्तातून प्लाझ्मा विलग करण्याचं काम सुरू आहे.