मंत्रालय । Photo Credits: Twitter/ANI

मुंबईतील मंत्रलायमध्ये (Maharashtra Legislature Secretariat) बॉम्ब (Bomb) ठेवल्याचा एक निनावी ऑल आल्याने एकच खळबळ पसरली आहे. दरम्यान ANI कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजावरून हा कॉल खोटा असल्याचा अंदाज आहे. सध्या मंत्रालयामध्ये बॉम्ब शोधक पथक (Bomb Detection and Disposal Squad) दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे. सुदैवाने आज रविवारचा आणि सुट्टीचा वार असल्याने कर्मचारी संख्या कमी आहे पण खात्री करून घेण्यासाठी बॉम्बशोधक पथक तैनात करण्यात आले असून पोलिस फौजफाटा देखील वाढवण्यात आला आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, 12.40 च्या सुमारास कंट्रोल रूमला एक फोन आला. त्यावेळेस मुंबई पोलिसांनी श्वासपथकासह मंत्रालयाची झाडाझडती करायला सुरूवात केली आहे. यावेळेस मंत्रालयात असलेली सुरक्षा देखील वाढवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

ANI Tweet

सध्या मंत्रलायामध्ये काही संदिग्ध वस्तू सापडतेय का? याचा तपास सुरू आहे पण त्यासोबतच निनावी फोन नेमका कुठून आला? हा कॉल कुणी केला याचादेखील तपास सुरू आहे. अद्याप या बाबत पुढील माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. सध्या कोरोना संकटामुळे देखील मंत्रालयात तुरळक कर्मचारी वर्ग उपस्थित आहे. पण खबरदारीच्या दृष्टीने सार्‍या इमारतीची तपासणी सुरू आहे.