मुंबई: मीरा रोड परिसरात रेस्टॉरंटच्या पाण्याच्या टाकीत 2 कामगारांचे मृतदेह
Image Used for Representational Purpose Only. (Photo Credits: ANI)

मुंबई (Mumbai) येथील मीरा रोड (Mira Road) परिसरात असलेल्या एका रेस्टॉरंटम आणि बारमध्ये पोलिसांनी दोन मृतदेह ताब्यात घेतले आहेत. हे दोन्ही मृतदेह याच रेस्टॉरंटमध्ये काम करत असलेल्या कामगारांचे असल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार हे मृतदेह पाण्याच्या टाकीत तरंगताना आढळले. मुंबई पोलीस (Mumbai Police) पुढील तपास करत आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रेस्टॉरंट मालकाला दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शोध घेतला असता हे मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळून आले. हे मृतदेह नरेश पंडीत (52) आणि हरेश शेट्टी या दोन कामगारांचे आहेत. हे दोन्ही कामगार हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होते. मृतदेहांवर जखमांच्या खुणाही आहेत. (हेही वाचा, Lockdown: लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 22 हजार 484 गुन्ह्यांची नोंद; 23 हजार 820 व्यक्तींना अटक)

बुधवारी रात्री सुमारे 10.30 वाजता पोलिसांना रेस्टॉरंटमधील दुर्गंधीबाबत सूचना देण्यात आली. पोलिसांनी परिसारचा तपास केला तेव्हा पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळून आले. लॉकडाऊन काळात हा बार प्रदीर्घ काळ बंद अवस्थेत होता. पोलिसांनी बारमालक आणि इतरांची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.