मुंबईतील 'या' भागात 9-10 जुलै रोजी पाणी पुरवठा बंद राहणार
प्रातिनिधिक प्रतिमा (photo Credit : pixabay)

मुंबईतील (Mumbai) काही भागात उद्या (9 जुलै) आणि 10 जुलै रोजी पाणी कपात असणार असल्याची सूचना महापालिकेकडून (BMC) देण्यात आली आहे. तर पाण्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम पवई (Powai) ते माहिम (Mahim) दरम्यान करण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पाईपलाईनचे काम सुरु करण्यात येणार असल्याने मुंबईच्या अंधेरीतील पूर्व चकाला, जीबी नगर, मरोळ आणि सहार येथे पाणी कपात असणार आहे. तर माटुंगा लेबर कॅम्प, माहिम आणि बांद्रे मधील काही भागासह धारावी येथे पाणी येणार नाही.

त्याचसोबत तानसा येथून पाईपलाईनमधून मुंबईकरांना पाणीपुवठा केला जातो. त्यामुळे या मार्गातील गळती झालेल्या पाईपलाईनचे काम करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिका माहिम पासून वैतरणा तलावाला जोडण्यात आलेले पाईप पुनर्स्थित करण्यात येणार आहेत.

(महाराष्ट्र: 9 जुलै मध्यरात्री पासून रिक्षा चालकांचा बेमुदत संप, भर पावसात जनतेची परवड)

परंतु महानगरपालिकेकडून मुंबईतील काही ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून 10 टक्के पाणी कपात करण्यात येत आहे. त्यामुळे आता बुधवारी आणि गुरुवारी K-East, H-East and G-North या भागातील नागरिकांनी पाणी भरुन ठेवावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. यापूर्वी जून 14 आणि 15 रोजी मुंबईतील काही भागात 15-20 टक्के पाणी कपात करण्यात आले होते. तर भातसा तलावात काही तांत्रिक बिघाडामुळे तो निर्णय घेण्यात आला होता.