Mumbai: जुहू (Juhu) येथे एका बीएमसी (BMC) मार्शला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये काही नागरिकांनी महापालिकेच्या मार्शलने मास्क न घातल्याने दंड भरण्यास सांगितला असता तर त्याला मारहाण केली गेली. या प्रकरणी महापालिकेच्या के वेस्ट वॉर्डने असे म्हटले की, याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऐवढेच नव्हे तर नागरिकांनी मार्शल याचा फोन घेऊन तो फेकून सुद्धा दिला.(Nagpur ने वाढवले राज्याचे टेंशन; पुण्याला प्रशिक्षणासाठी आलेल्या 12 पोलीस कर्मचाऱ्यांना Covid-19 ची लागण)
व्हायरल झालेल्या व्हिडिओत असे दिसून आले आहे की, मास्क न घातलेल्य व्यक्तीकडून मार्शला मारहाण केली जात असून त्याला मारण्यासाठी आणखी काही माणसे सुद्धा पुढे येतात. मात्र मार्शलने कसेबसे स्वत:ला त्यांच्या तावडीतून सुटत तेथून पळ काढला.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, ज्या लोकांनी मास्क घातले नसतील त्यांचे फोटो काढून त्यांना दंड भरण्यास सांगावे. पण त्या व्यक्तीने लगेच तोंडावर मास्क चढवला आणि त्याला फोटो दाखवल्यानंतर त्याने तेथेच राडा घालण्यास सुरुवात केली.(Mobile Game Addiction: मोबाईल गेम खेळण्यावरुन लहान भावासोबत वाद, 16 वर्षीय मुलीची आत्महत्या)
दरम्यान, सोमवारी दुपारी ही घटना घडल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तर मास्क न घातलेल्या त्याची चुकी दाखवून देण्यासाठी आम्ही फोटो काढतो असे त्यांनी म्हटले. तर मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी विविध ठिकाणी बीएमसी मार्शलची नेमणूक केली आहे. मास्क न घातल्यांना ते 200 रुपयांचा दंड नागरिकांकडून स्विकारतात.