Nagpur ने वाढवले राज्याचे टेंशन; पुण्याला प्रशिक्षणासाठी आलेल्या 12 पोलीस कर्मचाऱ्यांना Covid-19 ची लागण
Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये (Nagpur) कोरोना विषाणूची (Coronavirus) तिसरी लाट आल्याची माहिती मिळाली होती. आता नागपूरने केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण देशाचे टेंशन वाढवले आहे. याआधी इथे 16 एमबीबीएस विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, त्यानंतर आता 12 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे पोलीस 10 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पुण्यात गेले होते. 30 ऑगस्ट रोजी नागपूर पोलीस पथकाच्या सर्व 31 पोलीस ठाण्यांच्या प्रत्येक इंटेलिजन्स युनिटमधील एक पोलीस कर्मचारी आणि विशेष युनिटमधील दोन म्हणजे एकूण 33 पोलीस कर्मचारी 10 दिवसांच्या विशेष प्रशिक्षणासाठी पुण्यात आले होते.

प्रशिक्षण संपल्यानंतर ते नागपूरला परतले. नागपुरात परतल्यानंतर, एका पोलीस कर्मचाऱ्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसली. त्याला ताप आणि खोकला होता. त्यानंतर त्याने स्वतःची कोरोना चाचणी केली, तेव्हा अहवाल पॉझिटिव्ह आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पुण्याच्या प्रशिक्षणासाठी गेलेल्या उर्वरित पोलिसांचीही कोरोना चाचणी झाली. पुण्यात गेलेल्या 33 पोलिसांपैकी 20 पोलिसांची चाचणी झाली. त्यापैकी 12 पोलीस कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले.

उर्वरित लोकांची आज (12 सप्टेंबर, रविवार) चाचणी केली जाणार आहे. नागपूर पोलिसांच्या पथकाने खबरदारी म्हणून या सर्व पोलिसांना क्वारंटाईन केले आहे. या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांशी संबंधित लोकांचा संपर्क, ट्रेसिंग आणि चाचणी देखील केली जाईल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक आढळलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र या सर्वामध्ये कोरोनाची कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. (हेही वाचा: Mumbai: मुंबईत सील करण्यात येणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांची आरटी-पीसीआर चाचणी होणार)

दरम्यान, महाराष्ट्रातील प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर सरकार दावा करत आहे की राज्यात तिसरी लाट आली आहे. अचानक वाढणाऱ्या कोरोना प्रकरणाबाबत सरकार आणि प्रशासन सतर्क झाले असून, त्यांनी खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नागपुरात रात्री 8 वाजता रेस्टॉरंट्स आणि दुपारी 4 वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुंबई आणि पुण्यातही लोकांचा निष्काळजीपणा दिसला तर लवकरच निर्बंध लादले जाऊ शकतात.