Mobile Game Addiction: मोबाईल गेम खेळण्यावरुन लहान भावासोबत वाद, 16 वर्षीय मुलीची आत्महत्या
Suicide (pic credit: Wikimedia Commons)

मोबाईल गेम (Mobile Game) खेळण्यावरुन छोट्या भावासोबत झालेल्या वादातून 16 वर्षीय मुलीने आत्महत्या (Suicide ) केली आहे. मेडीकल स्टोअर्समधून उंदीर मारण्याचे औषध (Rat Poison) आणून ते प्राशन करुन आत्महत्या केली. मुंबई (Mumbai) येथील समता नगर (Samata Nagar) परिसरात ही घटना शुक्रवारी (10 सप्टेंबर) रात्री 11.30 वाजता घडली. अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या मुलीला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. परंतू, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. उपचार सुरु असताना मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर ही घटना प्रसारमाध्यमांतून पुढे आली.

घटनेबाबत माहिती अशी की, मुंबई येथील समता नगर परिसरात राहणाऱ्या एका मुलीचे आपल्या लहान भावासोबत भांडण झाले. हे भांडण मोबाईलवर गेम खेळण्यावरुन झाले. या भांडणात राग अनावर झाल्याने ही मुलगी मेडीकल स्टोअरमध्ये गेली तिथून तिने औषध मारण्याचे औषध खरेदी केले. ते औषध घेऊन ती घरी आली आणि भावासमोरच तिने ते प्राशन केले. (हेही वाचा, Maharashtra Legislative Council: 12 सदस्यांच्या यादीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची खोचक प्रतिक्रिया)

मुलीने औषध पिल्याची माहिती कळताच कुटुंबीय एकदम हबकून गेले. कुटुंबीयांनी अत्यवस्थ असलेल्या मुलीला तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल केले. परंतू, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेबाबत माहिती मिळताच समता नगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करुन पंचनामा केला. मुलीच्या आत्महत्येचे नेमके कारणही शोधण्याचा प्रयत्न केला. कटुंबीयांकडे चौकशी केली परंतू, ही आत्महत्या भावासोबत झालेल्या भांडणातून राग अनावर झाल्यानेच घडली असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.