Representational Image (Photo Credits: File Image)

तरूणाईमध्ये मोबाईल गेम (Mobile Game) आणि इंटरनेटचं (Internet) वाढतं गारूड धोकादायक आहे. आजकाल आयुष्याचा एक भागच झालेल्या या गोष्टी त्यांच्यापासून हिरावल्या तर त्यांच्यामध्ये अस्वस्थता वाढते. अशीच एक धक्कादायक घटना भंडारा शहरामध्ये घडली आहे. आई-बाबांनी मोबाईल गेम वर खेळण्यास नकार दिल्याने 16 वर्षांच्या एका मुलीने जीव दिल्याची घटना समोर आली आहे. रागाच्या भरात या तरूणीने वैनागंगा नदी मध्ये उडी मारून जीव दिला आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत तिचा मृतदेह बाहेर काढला. भंडारा शहरातील कस्तुरबा गांधी वॉर्ड मध्ये ही तरूणी आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती. Student Suicide: गुरुग्राम मध्ये 15 वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या; मुख्याध्यापक रागावल्यामुळे उचलले टोकाचे पाऊल.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, एका तरुणीला वैनगंगा नदीत उडी मारताना काही जणांनी पाहिले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी देखील घटनास्थळी पोहोचून नदीपात्रात शोधमोहीम सुरु केली. अंदाजे तासाभरात नदीपात्रामध्ये तरुणीचा मृतदेह सापडला. नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तरूणीने रागाच्या भरात नदीत उडून मारून आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊक उचलले असल्याचे सांगण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर कस्तुरबा गांधी वॉर्ड परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान मोबाईल गेम खेळू न दिल्याने अनेक किशोरवयीन मुलांनी अशाप्रकारे टोकाचे निर्णय घेतला असल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहे. पबजी सारख्या मोबाईल गेमच्या आहारी जाऊन देखील अनेकांनी जीवन संपवल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळे दुधारी शस्त्र असलेल्या सोशल मीडीयाला योग्यरित्या वापरणं यामध्येच शहाणपण आहे.